शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री म्हणतात, भाजपा-शिवसेना युती अबाधित

By admin | Updated: October 16, 2015 04:17 IST

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती अबाधित असून दोन्ही पक्ष एकोप्याने काम करीत आहेत, असा स्पष्ट निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिला.

हरिश गुप्ता,  नवी दिल्लीमहाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती अबाधित असून दोन्ही पक्ष एकोप्याने काम करीत आहेत, असा स्पष्ट निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिला.भाजप-शिवसेनेदरम्यान सौहार्द्याचे संबंध असून शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखावर मी प्रतिक्रिया देणार नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी काही म्हटल्यावरच मी प्रतिक्रिया देईन, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. शिवसेना युतीतून बाहेर पडेल किंवा भाजपच शिवसेनेशी फारकत घेईल, अशा तर्कविर्तकांना उधाण आणणाऱ्या प्रसार माध्यमातील वृत्ताबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदाच स्पष्ट प्रतिक्रिया दिली. युतीत काही समस्या जरुर आहेत; परंतु, आम्ही एकत्र आहोत. अन्य भागात स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढविणार असलो तरी मुंबई, पुणे आणि अन्य महापालिकेची निवडणूक मात्र एकत्रच लढविणार आहोत. खाते वाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद नसून, बिहारमधील निवडणुकीनंतर राज्यमंत्रिमंडळात फेरबदल केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.>युती संपुष्टात आणण्यास रा.स्व.संघाचा विरोध असल्याने महाराष्ट्रात भाजप-सेना युती अबाधित राहील, असे वृत्त ‘लोकमत’ ने दोन दिवसांपूर्वीच दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपरोक्तपणे स्पष्टोक्ती देत या वृत्ताला दुजोराच दिला आहे.