शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अर्थमंत्रालयाला निरोप देताना भावुक झाले चिदंबरम नऊ अर्थसंकल्पांचा विक्रम : आर्थिक आव्हानांचा केला सामना

By admin | Updated: May 15, 2014 23:57 IST

नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम, देशासमोरील आर्थिक आव्हाने पेलण्याच्या ध्यासाने दररोज १६ तास काम, अशी वैशिष्ट्यपूर्ण कारकीर्द लाभलेले अर्थमंत्री पी. चिदंबरम गुरुवारी अर्थमंत्रालयातील आपले चेंबर सोडताना अतिशय भावुक झाले होते

नवी दिल्ली : केंद्रात तीनदा अर्थमंत्रिपद, नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम, देशासमोरील आर्थिक आव्हाने पेलण्याच्या ध्यासाने दररोज १६ तास काम, अशी वैशिष्ट्यपूर्ण कारकीर्द लाभलेले अर्थमंत्री पी. चिदंबरम गुरुवारी अर्थमंत्रालयातील आपले चेंबर सोडताना अतिशय भावुक झाले होते. सचिव आणि वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर बोलताना त्यांनी देशासमोरील आर्थिक आव्हानांचा उल्लेख केला. सार्वजनिक जीवनात याआधीपेक्षा जास्त सक्रिय राहणार असल्याची ग्वाही दिली. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर सर्वाधिक दहा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम असून तो अद्याप अबाधित आहे.मी १९६६ पासून दररोज १६ तास काम करीत असून यानंतरही हा दिनक्रम कायम राहील. यानंतर तुम्ही मला सार्वजनिक जीवनात यापेक्षा अधिक सक्रिय बघाल असेही ते म्हणाले. चिदंबरम यांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढण्याचे टाळल्यामुळे ते राजकारणातून निवृत्त होणार अशी चर्चा होती.निरोप समारंभाच्यावेळी चिदंबरम अतिशय भावुक झाले होते. असे भावुक होण्याचा त्यांचा स्वभावच नाही, असे नॉर्थ ब्लॉकमधील अर्थमंत्रालयात चिदंबरम यांच्यासोबत दीर्घ काळ काम करणार्‍या एका अधिकार्‍याने सांगितले. संपुआ २ मध्ये अर्थमंत्री म्हणून अखेरच्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता ते नॉर्थ ब्लॉकमध्ये हजर झाले. त्यांनी फायलींचा निपटारा केला आणि वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली.ड्रीम बजेटचे सूत्रधार.....एच.डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वातील संयुक्त आघाडी सरकारमध्ये १९९६ मध्ये ते पहिल्यांदा अर्थमंत्री बनले होते. १९९७- ९८ चे ड्रीम बजेटचे सूत्रधार चिदंबरम हेच होते. संपुआ-१ च्या अखेरच्या काळात गृहमंत्रिपद सांभाळणारे चिदंबरम ऑगस्ट १२ मध्ये अर्थमंत्रालयात परतले तेव्हा त्यांच्यासमोर अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे मोठे आव्हान होते. वित्तीय आणि चालू खात्यातील तूट मर्यादेपेक्षा वाढू नये यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले.