(योगेश पणजीहून कुबलने दिलेली बातमी व ही बातमी तपासून घेणे) प्रदुषण फैलावणार्या फीश मिलप्रकल्पाचे उत्पादन बंद करण्याचा प्रदुषण नियंत्रण मंडळाचा आदेश
By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST
सहा कोटी खर्चून कुंकळ्ळीत सांड पाणी प्रकिया प्रकल्प उभारण्याचा निर्णयकुंकळ्ळी : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील युनायटेड मरायन्स या फीश मिल प्रकल्पाच्या मालकाने उत्पादन प्रक्रिया पध्दतीत योग्य बदल करी पर्यंत उत्पादन बंद करावे असा आदेश गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षानी मरायन युनायटेडचे मालक सेबी सिल्वा याना दिला आहे. कुंकळ्ळी औद्योगिक ...
(योगेश पणजीहून कुबलने दिलेली बातमी व ही बातमी तपासून घेणे) प्रदुषण फैलावणार्या फीश मिलप्रकल्पाचे उत्पादन बंद करण्याचा प्रदुषण नियंत्रण मंडळाचा आदेश
सहा कोटी खर्चून कुंकळ्ळीत सांड पाणी प्रकिया प्रकल्प उभारण्याचा निर्णयकुंकळ्ळी : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील युनायटेड मरायन्स या फीश मिल प्रकल्पाच्या मालकाने उत्पादन प्रक्रिया पध्दतीत योग्य बदल करी पर्यंत उत्पादन बंद करावे असा आदेश गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षानी मरायन युनायटेडचे मालक सेबी सिल्वा याना दिला आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतितील फीश मिल व मासळी प्रक्रिया प्रकल्प प्रकल्पामुळे या भागात उग्र दुर्गंधी पसरल्याची तक्रार स्थानिकानी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. त्या अनुषंघाने प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जुझे मानुयल नोरोन्हा यानी मंडळाचे तांत्रिक सल्लागार निखिल कायरो व रविंद्रा देसाई यांच्यासह फीश मिल प्रकल्पांची तपासणी केली. या तपासणीत मरायन फीश मिल प्रकल्पात मासळीची उग्र दुर्गंधी रोखण्यासाठी उपाय योजना आखली नसल्याचे दिसून आले. फीश मिलची प्रक्रिया पध्दती चुकीची असून या प्रकल्पाच्या मालकानी या संदर्भात त्वरीत तज्ञ अभियंत्याची नेमणूक करून प्रक्रिया पध्दती बाबतच अहवाल मंडळाला सादर करावा असा आदेश मंडळाच्या अध्यक्षानी युनायटेड मरायन्सला दिला आहे. प्रक्रिया अहवाल हाती लागल्यावर प्रदुषण नियंत्रण मंडळ योग्य तपासणी करून या प्रकल्पामुळे दुर्गंधी पसरत असल्यास पहाणी केल्यावरच युनायटेड मरायन्सवर निर्णय घेणार असल्याचे अध्यक्ष नोरोन्हा यानी सांगितले. युनायटेड मरायन्सला तुर्त उत्पादन बंद करण्याचा आदेश दिला आहे. युनायटेड मरायन्स या प्रकल्प व इतर फीश मिल्स प्रकल्पामुळे संपूर्ण कुंकळ्ळीत उग्र दुर्गंधी पसरली असून या फीश मिल्स बंद करण्याची मागणी स्थानिकानी केली आहे. या पाहणीच्यावेळी प्रदुषणाच्या विरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते ऑस्कर मार्टिन्स औद्योगिक वसाहतितील सर्व प्रदुषणकारी प्रकल्पाना टाळे ठोकण्याची मागणी केली आहे.दरम्यान औद्योगिक वसाहतीतील लोह उत्पादक कारखान्यात कारखानदारांनी त्वरीत धूर नियंत्रण उपकरणे बसवावीत अन्यथा या कारखानदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नोरोन्हा यानी दिला आहे. निकोमेट कारखान्याच्या आवारातील लेन्ड फील साईटची योग्य देखभाल करावी व कारखान्याच्या आवारात कोणत्याही प्रकारची गळती न होण्यासाठी तळभागात खास व्यवस्था करण्याचा आदेशही प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ या कारखान्याची नियमीतपणे तपासणी करणार असून 15 ऑक्टोबरला या भागातील कारखान्याची पुन्हा तपासणी करण्यात येणार असल्याचे नोरोन्हा यानी सांगितले.(प्रतिनिधी)चौकटकुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत सांड पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णयकुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत सुमार सहा कोटी रूपये खर्चून खास (ईटीफ़ी)सांड पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिली असून या भागात असलेल्या सहा फीश प्रक्रिया प्रकल्पासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.सहा कोटी रूपयांपैकी तीन कोटी रूपये केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ खर्च करणार आहे.दीड कोटी रूपये गोवा औद्योगिक वसाहत मंडळाकडून तर दीड कोटी रूपये फीश मिल प्रकल्पाच्या मालकांनी खर्च करायचे असल्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष नोरोन्हा यानी सांगितले.