शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया यांची भूमिकाही तपासणार

By admin | Updated: March 2, 2016 03:09 IST

२००४ साली अहमदाबादेत झालेल्या इशरत जहाँ चकमकीशी संबंधित सर्व फाइल्स, शपथपत्रे आणि अन्य कागदपत्रे यांचा शोध घेण्यास गृहमंत्रालयाने सुरुवात केली आहे

हरिष गुप्ता,  नवी दिल्ली२००४ साली अहमदाबादेत झालेल्या इशरत जहाँ चकमकीशी संबंधित सर्व फाइल्स, शपथपत्रे आणि अन्य कागदपत्रे यांचा शोध घेण्यास गृहमंत्रालयाने सुरुवात केली आहे. याप्रकरणात इशरत दहशतवादी असल्याचा उल्लेख टाळायला लावणारे शपथपत्र दाखल करण्याप्रकरणी तत्कालिन गृहमंत्री व काँग्रेस नेते पी़ चिदंबरम अडचणीत येण्याची चिन्हे आहेत़ तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही यात काही भूमिका होती का? याची छाननी होण्याची शक्यता असल्याचे संकेत दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासारख्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळत आहेत. ही चकमक बनावट असल्याचे केंद्रात त्यावेळी सत्तेवर असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे मत होते. माजी गृहसचिव जी.के. पिल्लई आणि गृहमंत्रालयातील अन्य एक वरिष्ठ अधिकारी आर.व्ही.एस. मणी यांनी इशरत जहाँ चकमकीचे दुसरे शपथपत्र तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्या सांगण्यावरुन बदलण्यात आल्याचा आरोप केला होता. ही चकमक बनावट होती आणि गुजरात पोलिसांनी तसेच आयबीच्या काही अधिकाऱ्यांनी घडवून आणल्याचे सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या शपथपत्रात बदल करण्यात आल्याचे या दोघांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रकरण न्यायालयात किंवा ससंदेत उपस्थित झाल्यास या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रांसह गृहमंत्रालय तयार राहणार आहे. त्या दृष्टीनेच सर्व कागदपत्रांचा शोध घेतला जात आहे. जून २००४ मध्ये अहमदाबादेत गुजरात पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाची कथित हस्तक इशरत जहाँ, तिचे साथीदार जावेद शेख, जिशान जोहर, अमजद अली यांना चकमकीत ठार मारले होते. हे सर्व जण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटात सहभागी झाले होते असा दावा गुजरात पोलिसांतर्फे त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणाचा प्रदीर्घ काळ तपास केल्यानंतर २००९ मध्ये अहमदाबाद न्यायालयाने ही चकमक बनावट असल्याचा निवाडा दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही चकमक बनावट होती किंवा नाही याचा तपास करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शपथपत्रातील माहितीनुसार इशरत आणि तिचे सहकारी हे लष्कर ए तोयबासाठी काम करत होते. आयबीने २००९ मध्ये गुजरात उच्च न्यायालयात आॅगस्ट २००९ मध्ये दाखल केलेल्या शपथपत्राव्दारे ही माहिती दिली आहे. पण, हे शपथपत्र याच वर्षी सप्टेंबरमध्ये बदलण्यात आले. यामध्ये इशरतचे अतिरेकी संबंध असल्याचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले. अर्थात चिदंबरम यांच्या निर्देशावरुनच हे करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. माजी गृह सचिव जी.के. पिल्लई हे या प्रकरणावरून काळजीत होते. कारण, इशरत ही अतिरेकी आहे की नाही हा तपास यंत्रणांशी संबंधित विषय होता.