शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

आत्महत्येसाठी सौरभने वापरले कमांडो चार्लीचे पिस्तूल

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ, विभागीय चौकशीचे आदेश : उपचारादरम्यान सौरभचा मृत्यू

पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ, विभागीय चौकशीचे आदेश : उपचारादरम्यान सौरभचा मृत्यू
नागपूर : व्यसनमुक्ती केंद्रात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या सौरभ सुरेश शर्मा याने कमांडो चार्लीच्या पिस्तूलचा वापर केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. हा कमांडो चार्ली गिट्टीखदान पोलीस ठाण्यातील हेमंत गोतमारे आहे. या प्रकरणात आज गिट्टीखदान पोलिसांनी हेमंत गोतमारेची दिवसभर चौकशी केली. पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांना या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपविली आहे.
गुरुवारी रात्री फ्रेंड्स कॉलनी येथील रहिवासी सौरभ शर्मा याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैत्री व्यसनमुक्ती केंद्रात स्वत:वर गोळी झाडली होती. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे सौरभचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरील सौरभने वापरलेली बंदूक ताब्यात घेतली. सौरभच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचा गिट्टीखदान ठाण्यातील कमांडो चार्ली हेमंत गोतमारे याच्याशी मैत्री असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हेमंतला विचारणा केली असता, त्याने बंदूक स्वत:ची असल्याची कबुली दिली.
हेमंत हा फ्रेंड्स कॉलनी येथे राहत होता. सौरभला दारुचे व्यसन होते. म्हणून त्याच्यावर व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरू होते. हेमंतला सुद्धा दारुचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. हेमंत गेल्या तीन वर्षापासून गिट्टीखदान ठाण्यात चार्ली आहे. घटनेच्या दिवशी हेमंत कर्तव्यावर होता. कर्तव्यावर असतानाही त्याने सौरभला स्वत:ची बंदूक दिल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वीही त्याला कर्तव्यात लापरवाही केल्यावरून निलंबित केले होते.
घटनेच्या दिवशी सौरभ व हेमंतने सोबत दारू घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सौरभ बंदूक घेऊन व्यसनमुक्ती केंद्रात गेला. त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने कानपटीवर बंदूक ठेवली. केंद्राचे संचालक पाध्ये यांनी त्याला थांबविण्याचा भरपूर प्रयत्न केला. पाध्ये यांनी सौरभकडून बंदूक हिसकावून घेतली. त्यामुळे सौरभ आणखी चिडला, त्याने बंदूक हिसकावून स्वत:वर गोळी झाडून घेतली. सौरभवर बऱ्याच वर्षापासून उपचार सुरू होते. घटनेनंतर सौरभवर बजाजनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यूनंतर अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.