शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कामगार आयुक्त कार्यालयात प्रभारी राज १६७ तक्रारी प्रलंबित : घरेलू व बांधकाम कामगारांची होते नोंदणी

By admin | Updated: February 22, 2016 19:28 IST

जळगाव : औद्योगिक वसाहतीसह घरेलू कामगार व बांधकाम कामगारांंना न्याय मिळावा यासाठी काम करणार्‍या साहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयात प्रभारी राज आहे. मंजुर ४१ मनुष्यबळाचे काम या ठिकाणी केवळ ९ जणांवर सुरु आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होऊन तब्बल १६७ तक्रारी प्रलंबित आहेत.

जळगाव : औद्योगिक वसाहतीसह घरेलू कामगार व बांधकाम कामगारांंना न्याय मिळावा यासाठी काम करणार्‍या साहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयात प्रभारी राज आहे. मंजुर ४१ मनुष्यबळाचे काम या ठिकाणी केवळ ९ जणांवर सुरु आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होऊन तब्बल १६७ तक्रारी प्रलंबित आहेत.
कामगार हिताच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी तसेच मालक व कामगार यांच्यातील व्यवहाराची अंमलबजावणी कामगार कायद्यानुसार होत आहे किंवा नाही यावर साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे नियंत्रण असते.

मंजुर मनुष्यबळ ४१ प्रत्यक्षात ९ जण
जळगाव साहाय्यक कामगार आयुक्त पदाचा तात्पुरता पदभार हा नाशिक येथील व्ही.एन.माळी यांच्याकडे आहे. तर सरकारी कामगार अधिकारी या पदाचा पदभार धुळे येथील अनिल कुंटे यांच्याकडे आहे. या कार्यालयात तीन लिपीकांची नियुक्ती आहे. त्यात चाळीसगाव, पाचोरा कार्यालयातील दोन लिपीकांना प्रतिनियुक्तीवर जळगाव कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. तर दुकान निरीक्षक, स्टेनो व एक लिपीक हे जळगाव कार्यालयात नियुक्त आहे. शासनाने या कार्यालयासाठी ४१ जणांचे मनुष्यबळ मंजुर केले आहे. मात्र प्रत्यक्षात ९ जणांवर काम सुरु आहे.


साहाय्यक आयुक्त व्ही.एन.माळी यांच्याकडे ४५ प्रकरणे प्रलंबित आहेत. तर सरकारी कामगार अधिकारी कुटे यांच्याकडे १२२ तक्रारी प्रलंबित आहेत. कामगार व मालक यांच्याकडून तब्बल १०० प्रकरणांमध्ये प्रतिसाद दिला जात नसल्याने त्यांना नोटीस काढण्यात आली आहे.
सरकारी कामगार अधिकारी कुंटे यांच्याकडे धुळे व जळगावचा पदभार आहे. त्यामुळे ते आठवड्यातून केवळ दोन दिवस जळगावात येत असतात. त्यातही एखाद्यावेळी धुळे कार्यालयातील कामाचा भार असल्यास ते आठवडाभर येत नसल्याची स्थिती आहे. अतिरिक्त पदभारामुळे कामगारांच्या तक्रारींचे तत्काळ निरसरण न होता त्या प्रलंबित राहण्याचे प्रमाण मोठे आहे.