शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भाजपेतर सरकारसाठी चंद्राबाबूंच्या भेटीगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 05:54 IST

राहुल गांधी व शरद पवारांशी पुन्हा गुफ्तगू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेची रणनीती आखण्याच्या दृष्टीने तेलुगू देसमचे नेते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी समविचारी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या.

शुक्रवारी दिल्लीत आलेल्या चंद्राबाबूंनी शनिवारनंतर पुन्हा रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणे लक्षणीय होते. दोन्ही बाजूंकडून भेटीचा तपशील दिला गेला नसला तरी विरोधकांच्या आघाडीत उघडपणे येण्याची भूमिका अद्याप तरी न घेतलेल्या सपा व बसपाच्या नेत्यांना लखनौमध्ये भेटून आल्यानंतर चंद्राबाबूंनी गांधी व पवार यांना पुन्हा भेटावे हे महत्त्वाचे मानले जात आहे.

याच अनुषंगाने नायडू रविवारी रात्री ‘संपुआ’च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही भेटणे अपेक्षित होते.भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी प्रसंगी पंतप्रधानपदाचा आग्रह न धरण्याचे संकेत काँग्रेसकडून दिले गेल्यानंतर विरोधकांची एकत्र मोट बांधण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शनिवारी दिल्लीत राहुल गांधीशरद पवार यांच्याखेरीज नायडू भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुधाकर रेड्डी व डी. राजा यांनाही भेटले होते. त्यानंतर त्यांनी लखनौ येथे जाऊन सपाचे नेते अखिलेश यादव व बसपाच्या प्रमुख मायावती यांच्याशीही चर्चा केली होती.याआधी नायडू यांनी गेल्या आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशीही चर्चा केली होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री व तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव याच दिशेने स्वतंत्रपणे प्रयत्न करीत आहेत. त्यांनाही सोबत घेण्यास आपल्याला वावडे नाही, असे नायडू यांचे म्हणणे आहे.

सोनिया गांधींनी बोलावली बैठकअर्थात या भेटीगाठींचे खरे फलित २३ मे रोजी निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. कोणाला किती जागा मिळतात, यावर कोण, कोणासोबत जायला तयार होईल, हे ठरेल. याच विचाराने सोनिया गांधी यांनी निकालाच्या दिवशीच २१ विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले आहे, तर सर्वांनी त्याआधी २१ तारखेलाच भेटावे, असा नायडू यांचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधी