शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबूंनी केले मुलालाही मंत्री

By admin | Updated: April 3, 2017 04:54 IST

वायएसआर काँग्रेसमधून तेलुगु देसममध्ये सहभागी झालेल्या चार आमदारांसह सहा जणांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश व वायएसआर काँग्रेसमधून तेलुगु देसममध्ये सहभागी झालेल्या चार आमदारांसह सहा जणांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. तर, पाच मंत्र्यांना मंत्रिमंंडळातून काढून टाकण्यात आले आहे. विधानसभेत वायएसआर काँग्रेसचे ६७ आमदार होते. फेब्रुवारी २०१६ पासून यातील २१ आमदार तेलुगु देसमसोबत गेले आहेत. तेलगु देसम- भाजपचे सरकार ८ जून २०१४ रोजी आल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळातील हा पहिला मोठा बदल आहे. यामुळे सत्तारुढ तेलुगु देसममध्येही असंतोष वाढला आहे. मंत्रिपदावरुन हटविण्यात आलेले एक मंत्री बी. गोपाल कृष्ण रेड्डी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चित्तूरचे आमदार असलेल्या रेड्डी यांनी रविवारी सकाळीच विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्याची एक प्रत मुख्यमंत्र्यांकडेही पाठविली आहे. तथापि, चंद्राबाबू नायडू यांनी बी गोपाल कृष्ण रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून मंत्रिपदावरुन काढण्यामागची कारणे सांगितली असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यपाल ई. एस. एल. नरसिम्हन यांनी नव्या मंत्र्यांना वेलागपुडी येथे राज्य सरकारच्या मुख्यालयाजवळ एका कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र्र प्रदेशातील मंत्र्यांची संख्या आता २६ झाली आहे. यात विधान परिषदेतील चार सदस्य आहेत. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या वायएसआरच्या चार आमदारात आर. व्ही. सुजाय कृष्ण राव, भूमा अखिल प्रिया, सी. आदिनारायण रेड्डी आणि एन. अमरनाथ रेड्डी यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था) >हा तर घटनेचा अपमानवायएसआरमधून तेलुगु देसमकडे गेलेल्या चार आमदारांना मंत्री करण्यात आल्यानंतर वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, हा घटनेचा आणि राज्याचा घोर अपमान आहे. आंध्रप्रदेशच्या राजकीय इतिहासातील हा काळा दिवस आहे. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असूनही या घटनात्मक उल्लंघनात ते सहभागी झाले.