शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शापूरजी आणि पालनजी मिस्त्रींना हटवण्याच्या निर्णयाला देणार आव्हान

By admin | Updated: October 24, 2016 22:02 IST

शापूरजी आणि पालनजी या निर्णयाविरोधात कोर्टाचा दरवाजाही ठोठावण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 24 - टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रींना हटवण्याच्या निर्णयावर टाटा समूहात सर्वात मोठा भागीदार असलेल्या शापूरजी आणि पालनजी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "टाटा सन्समधून सायरस मिस्त्रींना पदावरून दूर करण्याचा निर्णय हा अवैध आहे. सायरस मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय हा सर्वानुमते घेण्यात आला नाही. माजी सॉलिसिटर जनरल मोहन परासरन यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली आहे, असं शापूरजी आणि पालनजी समूहानं सांगितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शापूरजी आणि पालनजी या निर्णयाविरोधात कोर्टाचा दरवाजाही ठोठावण्याची शक्यता आहे. सायरस मिस्त्रींना हटवण्याच्या निर्णयावर नऊ बोर्ड सदस्यांपैकी फक्त 8 जणांनी मतदान केलं. त्यातही दोन जण तटस्थ राहिले, अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्सनं दिली आहे. सायरस मिस्त्री याआधी शापूरजी आणि पालनजी यांच्या समूहात व्यवस्थापकीय संचालक होते. मिस्त्री हे शापूरजी आणि पालनजी यांच्या जवळचे समजले जातात. (सायरस मिस्त्रींना 'टाटा')काही तासांपूर्वीच 'टाटा सन्स'ने सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून दूर केलं आहे. तूर्तास रतन टाटा यांची ४ महिन्यांसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सर्च पॅनल 4 महिन्यांत नव्या अध्यक्षाची निवड करणार आहे. चार वर्षांपूर्वी 28 डिसेंबर 2012 रोजी सायरस मिस्त्री यांची 'टाटा सन्स'च्या अध्यक्षपदी निवड झाली होती. या सर्च पॅनलमध्ये रतन टाटा यांच्यासह वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन आणि कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे.