शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागात मतदानाचे आव्हान

By admin | Updated: September 23, 2014 05:04 IST

नक्षलग्रस्त जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान राहणार आहे.

गडचिरोली : नक्षलग्रस्त जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान राहणार आहे. नक्षलवाद्यांचा लोकशाही प्रक्रियेला विरोध असून, त्यांनी यावेळी मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात ही पत्रके वाटली जात आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागात मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दुसरीकडे प्रशासनाने नक्षलग्रस्त भागात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवली असून मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आरमोरी, अहेरी, गडचिरोली विधानसभा मतदार संघांमध्ये एकूण ८९३ मतदान केंद्र आहेत. यापैकी १८३ अतिसंवेदनशील आहेत. तर २३४ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांमध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ६१, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील २५ व अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वाधिक ९७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर गडचिरोली पोलीस दलाचे शेकडो जवान, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांचेही तेवढेच जवान तैनात करावे लागतात. मतदान केंद्रापासून १५ ते २० किमीवरून मतदारांना येथे मतदानासाठी आणावे लागते. यंदा गडचिरोली प्रशासनाने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनाचीही व्यवस्था केली आहे.