शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

पाचव्या महिन्यानंतरच्या पूर्ण गर्भपातबंदीस सुप्रीम कोर्टात आव्हान

By admin | Updated: July 22, 2016 04:23 IST

पोटातील गर्भ पूर्ण वाढू दिला तर त्याने मातेच्या आणि जन्माला येणाऱ्या मुलाच्या जीवाला धोका संभवू शकतो

नवी दिल्ली : पोटातील गर्भ पूर्ण वाढू दिला तर त्याने मातेच्या आणि जन्माला येणाऱ्या मुलाच्या जीवाला धोका संभवू शकतो, असे दिसत असले तरी पाच महिन्यांहून अधिक वाढ झालेल्या गर्भ डॉक्टरांच्या मदतीने काढून टाकण्यास संपूर्ण प्रतिबंध करणाऱ्या गर्भपात प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालय तपासणार आहे.बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या महाराष्ट्रातील एका महिलेने ही याचिका केली असून न्या. जगदीश सिंग केहार, न्या. कुरियन जोसेफ व न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने त्यावर केंद्र व राज्य सरकारला नोटिस काढण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्तीचे ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी यावर तातडीने सुनावणी घेण्याची निकड लक्षात आणून दिल्यानंतर खंडपीठाने लगेच शुक्रवारी सुनावणी घेण्याचे ठरविले व त्यासाठी याचिकाकर्त्यांनी अ‍ॅटर्नी जनरल कार्यालयामार्फत तातडीने नोटीस बजावावी, असे सांगितले.याचिकाकर्तीची वैद्यकीय अवस्था खरंच किती गंभीर आहे, याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मेडिकल बोर्डाकडून आपण अहवालही मागवून घेऊ, असे खंडपीठाने सांगितले.कायद्याने घातलेली बंदी मनमानी स्वरूपाची, गैरवाजवी, कठोर, पक्षपाती असल्याने राज्य घटनेने अनुच्छेद २१ व १४ अन्वये दिलेल्या सुखासमाधानाने जगण्याच्या व समानतेच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारी असल्याने ती घटनाबाह्य ठरवून रद्द करावी, अशी आग्रही मागणी याचिकेत करण्यात आली. ही महिला याचिकेत म्हणते की, फसवणुकीने झालेल्या बलात्कारातून झालेली ही गर्भधारणा आधीच मानसिक क्लेष देणारी आहे. त्यातच माझ्या पोटात वाढत असलेल्या गर्भात गंभीर स्वरूपाचे व्यंग असल्याचे चांचण्यांमध्ये दिसून आले आहे. पोटात वाढत असलेले मूल विद्रुप व गंभीर व्यंग घेऊन जन्माला येणार आहे हे माहित असूनही गर्भ पूर्ण वाढू देऊन मूल जन्माला घालण्याची कायद्यातील सक्ती माझ्या आयुष्यातील सुखचैन हिरावून घेणारी आहे.याचिका म्हणते की, कायद्याच्या कलम ५ मध्ये गर्भवतीचे प्राण वाचविण्यासाठी पाचव्या महिन्यानंतरही गर्भपाताची मुभा दिलेली आहे. परंतु यात गर्भवतीची केवळ शारीरिक तंदुरुस्ती अभिप्रेत आहे. यात गर्भवतीच्या मानसिक आरोग्याचाही समावेश केला जायला हवा. तसेच पाचव्या महिन्यानंतर गर्भात गंभीर व्यंग आढळून आल्यास उद््भवणाऱ्या विचित्र परिस्थितीचाही यात विचार व्हायला हवा.आपल्यासारख्या परिस्थितीत अडकणाऱ्या इतर महिलांवर अशी वेळ येऊ नये या दृष्टीने या महिलेने याचिकेत अशीही मागणी केली आहे की, ज्यांना बलात्कारातून गर्भधारणा झाली आहे व ज्यांच्या गर्भाची २० आठवड्यांहून अधिक वाढ झाली आहे अशा महिला व मुलींची तपासणी करून त्यांना गर्भपात करून घेण्यास मदत करण्यासाठी इस्पितळांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे स्थायी स्वरूपाचे पॅनेल तयार करण्याचे आदेश सरकारला द्यावेत. मुंबईतील एक डॉक्टर निखिल दातार यांनीही गर्भपात कायद्यातील नेमक्या याच तरतुदीविरुद्ध सन २००९ मध्ये केलेली याचिकाही न्यायालयात प्रलंबित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>गर्भात आढळले गंभीर व्यंगगर्भपाताचे नियमन करणाऱ्या ‘मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नन्सी अ‍ॅक्ट’ च्या कलम ३(२) अन्वये २० आठवड्यांहून (पाच महिने) अधिक वाढ झालेल्या गर्भाचा कोणत्याही परिस्थितीत गर्भपात करण्यास पूर्ण प्रतिबंध आहे. आपल्या पूर्वीच्या प्रियकराने लग्नाचे खोटे आमिष दाखवून केलेल्या बलात्कारातून आपण गर्भवती झालो, असे याचिका करणाऱ्या या महिलेचे म्हणणे आहे. आता आपला गरोदरपणाचा २४ वा आठवडा (सहा महिने) सुरू आहे. डॉक्टरांनी केलेल्या चाचण्यांमध्ये आपल्या गर्भात ज्यामुळे मूल मेंदू व कवटीचा काही भाग अजिबात नसलेल्या अवस्थेत जन्माला येते, असा ‘अ‍ॅनेन्सेफली’ नावाचे व्यंग असल्याचे निष्पन्न झाले. परंतु कायद्यातील तरतुदींवर बोट ठेवून डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिल्याने, आता तिने गर्भपातासाठी न्यायालयाकडे परवानगी मागतानाच कायद्यातील या अन्याय्य प्रतिबंधासही आव्हान दिले आहे.