शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मतदानयंत्र हॅक करण्याचे आव्हान प्रयत्नाविना संपले

By admin | Updated: June 4, 2017 00:47 IST

देशभरात निवडणुकीसाठी वापरली जाणारी मतदानयंत्रे पूर्णपणे निर्धोक आणि विश्वासार्ह आहेत याची खात्री करून देण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशभरात निवडणुकीसाठी वापरली जाणारी मतदानयंत्रे पूर्णपणे निर्धोक आणि विश्वासार्ह आहेत याची खात्री करून देण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी ‘या आणि आमची मतदानयंत्रे हॅक करून दाखवा’ हा जाहीर आव्हानात्मक कार्यक्रम आयोजित केला. परंतु हे आव्हान यंत्रे हॅक करण्याचा कोणीही प्रयत्न न करताच संपले.राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोन राजकीय पक्षांनी यात सहभाग घेतला. परंतु आम्हाला मतदानयंत्रे हॅक करण्यात स्वारस्य नाही. आम्ही त्यांचे काम समजावून घेऊन शंका समाधान करून घेण्यासाठी आलो आहोत, असे या पक्षांच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यानुसार या प्र्रतिनिधींनी यंत्रांच्या कामाची प्रात्यक्षिके पाहून व आयोगाच्या तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आपल्या शंका व किंतू दूर झाल्याचे सांगून समाधान व्यक्त केले, असे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. निस्सिम झैदी यांनी पत्रकारांना सांगितले.झैदी म्हणाले की, मार्क्सवादी पक्षाच्या प्रतिनिधींनी शंकासमाधान झाल्यानंतर अशी सूचना केली की, भविष्यातही अशा शंकांना जागा राहू नये यासाठी आयोगाने अशीच सक्रियता दाखवावी.झैदी म्हणाले की,खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही आम्हाला आव्हान देण्यात नव्हे तर शंका दूर करून घेण्यात स्वारस्य आहे, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी वापरलेल्या मतदानयंत्रांमध्ये गोंधळाचे जे प्रकार झाले त्यावरून शंका निर्माण झाल्याचे या पक्ष प्रतिनिधींचे म्हणणे होते. यावर महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांसाठी वापरली गेलेली मतदानयंत्रे राष्ट्रीय आयोगाची नव्हती, असे स्पष्ट केले.निवडणुकांचे पावित्र्य, निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवून नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढमूल करण्यासाठी आयोग शक्य ते सर्व करेल. निवडणूक प्रक्रियेवरील लोकांच्या श्रद्धेला तडा जाईल, असे आयोग काहीही घडू देणार नाही.-डॉ. नसिम झैदी, मुख्य निवडणूक आयुक्त