शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

डाळींच्या भाववाढीने केंद्र सरकार चिंतित

By admin | Updated: October 22, 2015 04:04 IST

सणासुदीचे दिवस तोंडावर असताना डाळींचे दर २०० रुपये किलोवर गेल्यामुळे सरकार चिंतेत पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दरवाढ आणि पुरवठ्याबाबत मंत्रिमंडळाच्या

नवी दिल्ली : सणासुदीचे दिवस तोंडावर असताना डाळींचे दर २०० रुपये किलोवर गेल्यामुळे सरकार चिंतेत पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दरवाढ आणि पुरवठ्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला. दुसरीकडे मंत्रिमंडळ सचिवांनी डाळींच्या दरवाढीबाबत स्वतंत्रपणे आढावा चालविला आहे.महाराष्ट्र सरकारने मंगळवारी १६ जिल्ह्यांमध्ये २७६ ठिकाणी छापे घालत २३,३४० टन डाळ जप्त केल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. धाडसत्र सुरू असल्यामुळे विविध डाळींचे दर घसरत असल्याची नोंदही यावेळी घेण्यात आली. ग्राहक कल्याण मंत्रालयाने यापूर्वीच राज्य सरकारांना साठेबाजी आणि काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)व्यावसायिक वादांच्या निपटाऱ्यासाठी दोन वटहुकूमव्यावसायिक वादांचा तातडीने निपटारा करण्यासाठी दोन वटहुकूम जारी केले आहेत. लवाद आणि समेटासंबंधी कायद्यात दुरुस्ती करताना वाणिज्य न्यायालय, वाणिज्य विभाग आणि उच्च न्यायालयांमध्ये वाणिज्य अ‍ॅपिलेट स्थापन करण्यासंबंधी (कायदा २०१५) विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे प्रलंबित होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळाने लवाद कायद्यात सुधारणा केली; मात्र ते मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविले नव्हते. लवाद आणि समेट कायदा १९९६ सुधारणा करताना वाद १८ महिन्यांत सोडविणे अनिवार्य राहील. संबंधित दुसऱ्या कायद्यातील सुधारणेनुसार लवादाच्या शुल्कावर मर्यादा आणली जाणार आहे.दरमहा बोनसची कमाल मर्यादा आता सात हजार रुपयेकारखाना कामगारांसाठी दरमहा बोनसची कमाल मर्यादा आता सात हजार रुपये करण्यात आली आहे. २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या उद्योगासाठी हा नियम लागू असेल. सध्या ही मर्यादा ३५०० रुपये आहे. सुधारित बदल १ एप्रिल २०१५ पासून लागू राहील. वेतनातून दिल्या जाणाऱ्या पात्र बोनसची मर्यादाही दरमहा १० हजार रुपयांवरून २१ हजार रुपये करण्यात आली आहे. सदर विधेयकामधील कलम १२ मध्ये करण्यात आलेल्या नव्या तरतुदीनुसार बोनसचा वेगवेगळा आधार ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला असेल.