शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर केंद्राची २ हजार कोटींची मदत

By admin | Updated: March 25, 2015 02:36 IST

दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

सर्वाधिक पॅकेज : अवकाळी मदत राज्यानेच उभारावीनवी दिल्ली : दुष्काळाच्या दुष्टचक्र ात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींची मदत मागितल्यानंतर तब्बल साडे तीन महिन्यांनी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही रक्कम मागणीच्या अवघी ३३ टक्के असली तरी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीने देऊ केलेली रक्कम केंद्राच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येत असून, राज्यानेच शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निधीतून मदत करावी, अशी भूमिका उच्चस्तरीय समितीने घेतली. त्यानुसार मदतीचे वर्गीकरण न करता आपत्ती निवारणाच्या निकषानुसार तिचे वाटप राज्य सरकार करेल असे केंद्राने स्पष्ट केले. मागच्या वर्षी केंद्राने ५०० कोटींची मदत केली होती, यंदा २ हजार कोटींची केली आहे, असे मोठ्या अभिमानाने कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांनी सांगितले. राज्य सरकारने केंद्राकडे ६ हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव सादर केला होता. राज्यातील २३ हजार ८११ गावांमध्ये सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असून, केंद्राने मदत करावी म्हणून राज्य सरकारने सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला होता. जादा मदतीचे पॅकेज सरकार मागतच असते, मात्र केंद्र व राज्याशी समन्वय साधून समितीने दुष्काळी मदतीचा निर्णय घेतला. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण कोषातून भरपाई द्यावी. - राधा मोहन सिंग, कृषिमंत्री