केंद्र प्रमुखाने केला १५ लाखांचा अपहार शिष्यवृत्ती परस्पर काढली : फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील बडतर्फ केंद्रप्रमुख भाऊसाहेब चोखर यांनी १५ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत़
केंद्र प्रमुखाने केला १५ लाखांचा अपहार शिष्यवृत्ती परस्पर काढली : फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील बडतर्फ केंद्रप्रमुख भाऊसाहेब चोखर यांनी १५ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत़राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असताना भाऊसाहेब चोखर यांनी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व पोषण आहार योजनेतील मेहनताना असे एकूण १५ लाख रुपये परस्पर काढल्याचे प्रकरण उघडकीस आले होते़ विद्यार्थ्यांना द्यावयाच्या शिष्यवृत्तीची रक्कम व पोषण आहार योजनेतील मेहनताना चोखर यांनी एप्रिल-मे २०१४ मध्ये परस्पर काढला होता़ राहुरी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे यांनी जिल्हा परिषदेला अहवाल सादर केल्यानंतर चोखर यांच्यावर जून २०१४ मध्ये निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती़ निलंबन कालावधीत संगमनेर हेडक्वॉर्टरला थांबणे चोखर यांच्यावर बंधनकारक करण्यात आले होते़ त्यामुळे चोखर सध्या संगमनेर पंचायत समितीत कार्यरत असून, जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा अधिकार्यांमार्फत चोखर यांची चौकशी करण्यात आली आहे़ या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला़ त्यानंतर नवाल यांनी चोखर यांच्यावर फौजदारी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत़़़़़़़़़़़़़़़जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी मागील आठवड्यात चोखर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत़ चोखर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत विस्तार अधिकारी चंद्रकांत शेलार यांना पत्र दिले असून, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे़- बाळासाहेब धनवे, गटशिक्षण अधिकारी, राहुरी