शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्याचे मंत्रीही ‘आरटीआय’च्या घेऱ्यात

By admin | Updated: March 14, 2016 02:48 IST

केंद्र व राज्यांचे कॅबिनेट मंत्री हे ‘सार्वजनिक अधिकारी’ आहेत आणि माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणे व नागरिकांनी मागितलेली माहिती पुरविणे बंधनकारक आहे

नवी दिल्ली : केंद्र व राज्यांचे कॅबिनेट मंत्री हे ‘सार्वजनिक अधिकारी’ आहेत आणि माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणे व नागरिकांनी मागितलेली माहिती पुरविणे बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल केंद्रीय माहिती आयुक्तांनी दिला.मंत्र्यांना आरटीआयच्या कक्षेत आणल्यानंतर आता लोकांना आरटीआय अंतर्गत अर्ज दाखल करून कोणत्याही मंत्र्याला थेट प्रश्न पाठवून त्याचे उत्तर मागितले जाऊ शकेल. ‘केंद्र व राज्य सरकारांनी काही अधिकारी नामनियुक्त करून किंवा लोक माहिती अधिकारी तसेच प्रथम अपीलेट अधिकाऱ्याच्या रूपात नियुक्ती करण्यास प्रत्येक मंत्र्याला आवश्यक ती साहाय्यता पुरविण्यात यावी, अशी शिफारस करण्यात येत आहे,’ असे माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी आदेशात म्हटले. ‘गोपनीयतेची शपथ’ऐवजी ‘पारदर्शकतेची शपथ’ या शब्दाचा वापर करण्यात आला पाहिजे, ज्यामुळे मंत्रीदेखील नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचा सन्मान करतील आणि नागरिकांप्रति उत्तरदायी राहतील, असे निर्देश आचार्युलू यांनी दिले. अहमदनगरचे रहिवासी हेमंत ढगे यांच्या प्रकरणात निकाल जाहीर करताना आचार्युलू यांनी हे निर्देश दिले. कॅबिनेट आणि राज्यांच्या मंत्र्यांची लोकांना भेटण्याची वेळ कोणती, असा प्रश्न ढगे यांनी तत्कालीन केंद्रीय कायदा व न्याय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांना विचारला होता. तुम्ही स्वत: मंत्र्यांनाच भेटा, असे ढगे यांना सांगण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)दावा केला अमान्यमाहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माहिती उपलब्ध करून दिली जाऊ शकेल, अशी आवश्यक संरचना कॅबिनेट स्तरावरील मंत्र्यांजवळ उपलब्ध नसते आणि मंत्री हा केवळ ‘एक व्यक्ती कार्यालय’ असल्याने त्याला सार्वजनिक अधिकारी मानले जाऊ शकत नाही, हा दावा मान्य केला जाऊ शकत नाही, असे आचार्युलू यांनी या आदेशात नमूद केले आहे. रामायणाचा उल्लेख करताना आचार्युलू म्हणाले, ‘रामाने आपल्या महालाच्या प्रवेशद्वारावर एक घंटा बांधलेली होती. जो कुणी ही घंटा वाजवित असे, त्याला भेटण्यासाठी आणि त्याची समस्या ऐकण्यासाठी राम महालाबाहेर येत असे. ही बाब रामराज्यात तक्रारींचे निराकरण करण्याच्या व्यवस्थेचे निदर्शक आहे.’तुम्ही मंत्र्याकडे जाऊन भेटीची वेळ मागा, असे सार्वजनिक अधिकाऱ्याने (कायदा व न्याय मंत्रालय) अपीलकर्त्याला निर्देश देणे उचित ठरत नाही. एका नागरिकाला आपण निवडून पाठविलेल्या मंत्र्याच्या भेटीची वेळ आणि त्याच्या प्रक्रियेबाबत जाणून घेण्यासाठी आरटीआय अर्ज दाखल करावा लागणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा प्रकारची माहिती कलम ४ (१) (बी) अन्वये स्वेच्छेने पुरविण्यात आली पाहिजे, असेही आचार्युलू यांनी स्पष्ट केले.