भिवानी : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या भिवानी परिसरातील सिवनी या गावी मंगळवारी जणू दिवाळीच साजरी झाली. गावकऱ्यांनी मिठाई वाटली. फटाके फोडून आनंद व्यक्त केला.हरियाणातील भिवानी या छोट्याशा गावाने तीन मुख्यमंत्री दिले आहेत. बन्सीलाल, बनारसी दास आणि मास्टर हुकूमसिंग ही या तिघांनी दीर्घ काळपर्यंत राजकारणावर हुकुमत ठेवली आहे. आमचे कुटुंब विजयोत्सव साजरा करीत आहे, असे केजरीवाल यांची नातेवाईक सुमन गोयल यांनी सांगितले. केजरीवालांचे पूर्वज खेडा या गावी वास्तव्याला होते. आता ते भिवानीपासून ६० कि.मी. अंतरावरील सिवनी या गावी स्थायिक झाले आहेत. हिसार, सिवनी आणि खेडा या गावांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. केजरीवालांच्या नातेवाईकांनी केजरीवालांसोबतच त्यांची माता गीतादेवी यांचेही फोनवरून अभिनंदन केले. केजरीवाल यांचे आजोबा मुरली लाल यांचे निधन झाले तेव्हा गेल्यावर्षी जुलैमध्ये त्यांनी सिवनीला भेट दिली होती.
केजरीवाल यांच्या गावी दिवाळी साजरी
By admin | Updated: February 11, 2015 02:00 IST