सीडीसाठी : अतिदुर्गम भागात सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांच्या वापरावर भर! पंदेकृविचा उपक्रम : आदिवासी शेतकर्यांना प्रशिक्षण
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
अकोला- आदिवासी आणि अतिदुर्गम भागात कुपोषणासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांचा वापर करून पोषक आहार आदिवासींना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अतिदुर्गभ भागातील शेतकर्यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आदिवासी शेतकर्यांना प्रशिक्षण दिले असून, ९ फेब्रुवारी रोजी मेळघाटातील चांदपूर-टेंभ्रूसोंडा या दुर्गम भागातील गावात शेतकर्यांना पोषक आहार व आरोग्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घटक याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
सीडीसाठी : अतिदुर्गम भागात सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांच्या वापरावर भर! पंदेकृविचा उपक्रम : आदिवासी शेतकर्यांना प्रशिक्षण
अकोला- आदिवासी आणि अतिदुर्गम भागात कुपोषणासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांचा वापर करून पोषक आहार आदिवासींना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अतिदुर्गभ भागातील शेतकर्यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आदिवासी शेतकर्यांना प्रशिक्षण दिले असून, ९ फेब्रुवारी रोजी मेळघाटातील चांदपूर-टेंभ्रूसोंडा या दुर्गम भागातील गावात शेतकर्यांना पोषक आहार व आरोग्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घटक याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. मानवी आरोग्यासाठी अन्नद्रव्यातील सूक्ष्म घटक महत्त्वपूर्ण आहेत. विशेषत: ज्या भागात कुपोषणाची समस्या अधिक आहे, अशा भागात सूक्ष्म अन्नघटकांचे महत्त्व अधिकच वाढते. कुपोषणासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजनांसोबतच पोषक आहारही महत्त्वाचा आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातर्फे अखिल भारतीय समन्वयित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पातील आदिवासी साहाय्यक योजनेंतर्गत अतिदुर्गम भागातील आदिवासी शेतकर्यांना पीक उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्त्व पटवून सांगण्याकरिता कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. अमरावती जिल्ात मेळघाटामध्ये या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. पंदेकृविचे संशोधक संचालक डॉ. डी.एम मानकर, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.डी.बी. तामगाडगे यांच्या उपस्थितीत चांदपूर-टेंभ्रूसोंडा येथे शेकडो आदिवासींना सुधारित तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व आदिवासी शेतकर्यांना पटवून सांगण्यात आले. डॉ. राजेंद्र काटकर यांनी पीक पोषण व मानवी आरोग्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व विशद केले. माती नमुना तपासणी करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करून जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवता येते. याबाबत डॉ.डी.व्ही. माळी आणि डॉ.एन.एम. कोंडे यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी) ........बॉक्स जस्ताचा वापरगहू व हरभरा पिकांकरिता जस्ताचा वापर आवश्यक आहे. जस्त वापरासंबंधी माहिती आदिवासी शेतकर्यांना कृषी शास्त्रांनी दिली. दुर्गम भागात शास्त्रांनी आदिवासी शेतकर्यांना आधुनिक पद्धतीने शेती करून पोषक अन्नधान्य पिकांबाबत माहिती दिली. त्यामुळे आदिवासीबहुल भागातील कुपोषणासारख्या समस्येचे निराकरण करण्यास मदत होणार आहे. ....................