शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक व अजिंठा चौकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कैद ५४ लाखांची बॅग चोरी : चोरट्यांच्या शोधार्थ सहा पथके रवाना

By admin | Updated: July 19, 2016 23:41 IST

जळगाव: कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्‍याची ५४ लाख रुपयाची रोकड लांबविणारे संशयित काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बॅँकेच्या मुख्य शाखेत तसेच अजिंठा चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. त्यांच्या शोधार्थ सहा पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिली.

जळगाव: कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्‍याची ५४ लाख रुपयाची रोकड लांबविणारे संशयित काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बॅँकेच्या मुख्य शाखेत तसेच अजिंठा चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. त्यांच्या शोधार्थ सहा पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिली.
अजिंठा चौकापासून काही अंतरावर असलेल्या राजेंद्र टायर्स या दुकानाच्या समोरुन कोठारी यांच्या कारचा काच फोडून सोमवारी ५४ लाख रुपये रोकड असलेली बॅग लांबविण्यात आली होती. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा जोमाने कामाला लागली. सोमवार व मंगळवार अशा दोन्ही दिवशी कोठारी ज्या मार्गावरुन गेले त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यात एचडीएफसी बॅँकेत दोन जण संशयास्पद दिसून येत आहेत तर तेच पुढे अजिंठा चौकात कारच्या मागे दुचाकीवर जातांना दिसून येत आहेत.
बॅँकेत त्यांचा व्यवहार नाही
फुटेजमध्ये आलेल्या दोनजणांची पोलिसांनी बॅंकेत चौकशी केली असता त्यांनी सोमवारी बॅँकेत कोणताच व्यवहार केला नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे त्यांच्यावरच संशय बळावला आहे. काळ्या शर्ट घातलेला एक रांगेत तर दुसरा पांढरा शर्ट घातलेला बाजूला थांबलेला आहे. बाहेर निघताना दोघंही सोबत आलेले आहेत. त्यांच्या शोधार्थ अहमदनगर, औरंगाबाद, मालेगाव व दाक्षिणात्य राज्यात प्रत्येकी एक व जिल्‘ात दोन असे सहा पथके स्वतंत्र कार्यान्वित केले आहेत.
औरगंाबादमध्ये घडली अशीच घटना
दोन दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे, सीआयडीने दिलेल्या मार्गदर्शनातही औरंगाबाद, अहमदनगर, मनमाड, मालेगाव येथे अशा प्रकारचे गुन्हे घडले असल्याचे म्हटले आहे. दाक्षिणात्य राज्यातील नेल्लुर जिल्‘ात अशाच प्रकार गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांची संख्या अधिक आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक वाय.डी.पाटील यांनी लक्ष विचलित करून बॅग लांबवणारी टोळी पकडली होती, तीदेखील याच राज्यातील होती.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी
बॅग लांबविणार्‍या रेकॉर्डवरील २५ ते ३० गुन्हेगारांना रात्रीतून पोलीस स्टेशनला आणून चौकशी करण्यात आली.मात्र त्यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले.फंगर प्रिंटमध्येही काहीच निष्पन्न झाले नाही. गेल्या पाच वर्षातील गुन्हेगारांचेही रेकॉर्ड काढण्यात येत असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. तिसेच घटना घडली त्या ठिकाणचे मोबाईल टॉवरचे लोकेशनही काढले जात असल्याचे सुपेकर म्हणाले.