विजापूर : सिंदगी तालुक्यातील आलमेल येथील वसतीगृहात विद्याथीर्नींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची कर्नाटक सरकारने गंभीर दखल घेत राज्यातील सर्व महिला वसतीगृहावर सीसीटीव्ही कॅमे:याची नजर ठेवण्यासह अशी घटना घडल्यास त्याची तक्रार करण्यासाठी विशेष दूरध्वनीची सुविधाही सर्व वसतिगृहात करण्यात येईल, असे समाजकल्याणमंत्री एच. अंजय्या यांनी सांगितले.
मुख्य आरोपी विजयकुमार एंटमाने हा वसतीगृहातच स्वयंपाकी सहायक असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वार्डन, वॉचमन, मुख्याध्यापिका यांना तातडीने बडतर्फ केल्याचे अंजय्या यांनी सांगितले. वसतीगृहातील 4क् विद्याथीर्नीवर गेल्या 4 वर्षापासून बलात्कार होत असल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली आह़े
अनेक प्रश्न अनुत्तरीत : ही घटना गेली चार वषार्पासून घडत असूनही कोणालाही याचा संशय कसा आला नाही. शिवाय ब:याच मुली गरोदर राहिल्याने त्यांचा गर्भपातही करण्यात आला होता. त्यामुळे ही गोष्ट कशी काय दडपण्यात आली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़