शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

देशात आजही जातीयवाद कायम - राहुल गांधी

By admin | Updated: June 2, 2015 17:55 IST

देशातील दलितांचे अधिकार हिरावून घेतले जात असून देशात आजही जातीयवाद कायम असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.

ऑनलाइन लोकमत महु, दि. २ - देशातील दलितांचे अधिकार हिरावून घेतले जात असून देशात आजही जातीयवाद कायम असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या कार्यक्रमाला काँग्रेसने मध्यप्रदेशातील महू येथून आजपासून प्रारंभ केला त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेल्या मध्यप्रदेशातील महू गावाची निवड करुन आम्हीच बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार आहोत असे दाखविणा-या काँग्रेस आणि २०१५ ते २०१६ हे वर्ष आंबेडकर यांची १२५ वे जयंती वर्ष देशभर साजरे करणार असल्याची घोषणा करणारे केंद्रातील भाजप सरकारमध्ये पुन्हा एकदा आंबेडकर यांच्या श्रेयवादावरुन जुंपणार असल्याचे दिसत आहे. देशात जातीयवाद संपवण्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्याची रिंगटोन वाजवली म्हणून दलित तरुणाची हत्या होतेय, केवळ मुस्लीम असल्यानं युवकाला नौकरी नाकारली जातेय, तसेच केंद्र सरकारवर टीका केली म्हणून मद्रास आयआयटीमध्ये आंबेडकर-पेरीयार या दलित संघटनेवर बंदी घातली जातेय हा दलितांचे हक्क हिरावले जात असल्याचाच प्रकार आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशात जातीधर्माच्या आधारावर भेदभाव व्हायला नाही पाहिजे. संविधानात सर्व धर्मांना समानतेचा अधिकार बहाल करण्यात आला असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसने शिक्षण आणि भोजन अधिकार हा सर्व गरीब व्यक्तींसाठी दिला असल्याचे आठवण करुन दिली. देशातील जातीयवाद संपवण्यासाठी तरुणांनी एकत्र यायला हवे असे आवाहन राहुल गांधी यावेळी केले.