शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव प्रकरणी शरीफ यांची लष्करप्रमुखांशी चर्चा

By admin | Updated: May 11, 2017 00:31 IST

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ

इस्लामाबाद : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी बुधवारी चर्चा केली. ९0 मिनिटे चाललेल्या या चर्चेत जाधव प्रकरणाशी संबंधित ताज्या परिस्थितीची माहिती शरीफ यांना देण्यात आली. जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरून मृत्यूदंड ठोठावला आहे.पाकचा तोरा कायम; म्हणेयोग्य पायरीवर उत्तर देऊजाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कोणत्याही प्रश्नाला ‘योग्य पातळीवर’ उत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी येथे म्हटले. लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘कायद्याची योग्य पद्धत अवलंबल्यानंतरच जाधव यांना लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांच्याबद्दल आयसीजेने पाकिस्तानला कोणतीही विनंती केली, तर आमचे सरकार योग्य पातळीवर त्याला प्रतिसाद देईल.’ जाधव यांच्या फाशीला आयसीजेने स्थगिती दिल्यानंतर लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्यानंतर लष्कराने वरील वक्तव्य केले. पाकिस्तानात भारत घडवून आणत असलेल्या दहशतवादावरील लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भारत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा वापर करीत आहे, असे संरक्षणमंत्री ख्वॉजा मुहम्मद असिफ यांनी म्हटले होते. आयसीजेचा अधिकार पाकिस्तानवर नाही. आयसीजे संबंधित पक्षांच्या संमतीनंतरच विषय हाती घेऊ शकते, असे जीओ टीव्हीने म्हटले. ‘डॉन’ने आॅनलाईनवर आयसीजेकडे भारताचा अर्ज आल्याचे वृत्त दिले; परंतु फाशीला स्थगिती मिळाल्याचा भारताचा दावा वृत्तात दिलेला नाही. ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’नेही आपल्या बातमीत भारताने स्थगिती मिळाल्याच्या केलेल्या दाव्याचा उल्लेख केलेला नाही.भारताने आयसीजेने जाधव यांच्या फाशीला दिलेल्या स्थगितीवर मोकळा श्वास घेतला असला तरी भूतकाळ आणि पाकिस्तानसोबतचे बिघडलेले संबंध जाधव यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात अडथळा ठरू शकतात. भारताने पूर्वी दोन देशांतील वादात आयसीजेच्या अधिकाराबद्दल प्रश्न विचारला होता. पाकिस्तान आयसीजेचा आदेश स्वीकारील का? तांत्रिकदृष्ट्या तो त्याने स्वीकारला पाहिजे; परंतु भूतकाळाकडे पाहिले तर तसे होण्याची शक्यता नाही. राष्ट्रकुलातील दोन देशांचा संबंध असलेल्या प्रकरणात आयसीजेला अधिकार नाही, असा युक्तिवाद भारताने पाकिस्तानविरोधात करून ते प्रकरण जिंकले होते. ‘आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणे विचारपूर्वक होते’ -नवी दिल्ली : कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस-आयसीजे) मागितलेली दाद हा ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय’ होता. कारण भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात बेकायदेशीरपणे डांबून ठेवले गेले आहे व त्यांच्या जीविताला धोकाही आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी येथे म्हटले. आयसीजेने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला मंगळवारी स्थगिती दिली. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधवप्रकरणी दाद का मागितली, असे वार्ताहरांशी विचारले असता मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले की, ‘भारताने जाधव यांची भेट घेण्यासाठी १६ वेळा केलेली विनंती पाकिस्तानने फेटाळली. भेट नाकारणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन होते. जाधव यांच्या कुटुंबियांना व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती २७ एप्रिल रोजी पाकला करण्यात आली होती. त्यानुसार व्हिसा मान्य करण्यात आला आहे.’