शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तेरेसांविरूद्ध भगव्या ब्रिगेडची मोहीम!

By admin | Updated: February 26, 2015 05:51 IST

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड बहुतमाची हवा डोक्यात गेल्याने ‘हिंदुत्वाचा अ‍ॅजेंडा’ नेटाने पुढे दामटण्यासाठी चौखूर उधळलेल्या

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड बहुतमाची हवा डोक्यात गेल्याने ‘हिंदुत्वाचा अ‍ॅजेंडा’ नेटाने पुढे दामटण्यासाठी चौखूर उधळलेल्या भगव्या ब्रिगेडची मजल आता निस्पृह सेवेसाठी संपूर्ण जगाने गौरविलेल्या मदर तेरेसा यांच्या बदनामीची पद्धतशीर मोहीम राबविण्यापर्यंत गेली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचा पाहुणचार घेतल्यानंतर कान टोचल्याने रोमन कॅथॉलिक चर्चने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्वातंत्र्याची ग्वाही दिल्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी धर्मांतरावरून नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसांवर चिखलफेक करावी यामागे सुनियोजित योजना असावी हे स्पष्ट आहे. मदर तेरेसा यांनी निराधार आणि गरिबांची केलेली सेवा निस्पृह नव्हती तर त्यायोगे धर्मांतर करण्याचा त्यांचा हेतू होता, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन बागवत याने केलेल्या विधानाने या वादाची पहिली ठिणगी पडली. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याची माझे सरकार जराही गय करणार नाही, असे म्हणणारे मोदी मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे सरकारने डोळे वटारल्यासारखे करावे व तो इशारा नसून अप्रत्यक्ष फूस आहे असे मानून भगव्या मंडळींनी आपला अ‍ॅजेंडा अधिक जोमाने राबवावा, असे आतून ठरले असावे, असा वास यातून अनेकांना येत आहे.भागवत यांच्या वक्तव्याशी सरकारचा काही संबंध नाही, असे भाजपा खासदार मीनाक्षी लेखी सांगून मोकळ््या झाल्या. तवा तापलेला आहे हे पाहून केंद्र व राज्यातील सत्तेत धाकटे भावंड असलेल्या शिवसेनेनेही त्यावर पोळी भाजून घेतली. ‘सामना’ या सेनेच्या मुखपत्राने भागवत यांची पाठराखण केली.मदर तेरेसा हयात असतानाही या संस्थेत धर्मांतर घडवून आणले जात नव्हते व आताही जात नाहीस अशी प्रतिक्रिया मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज आॅफ चॅरिटी’च्या प्रमुख प्रवक्त्या सिस्टर सुनीता कुमार यांनी दिली.(लोकमत न्यूज नेटवर्क)