शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टर खरेदी; खेतान यांना अटक

By admin | Updated: September 24, 2014 03:34 IST

सक्तवसुली संचालनालयाने ३,६०० कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाशी संबंधित चौकशीअंतर्गत मंगळवारी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला.

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने ३,६०० कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाशी संबंधित चौकशीअंतर्गत मंगळवारी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. एका आरोपी कंपनीच्या संचालक मंडळाचा माजी सदस्य गौतम खेतान याला मंगळवारी अटक करण्यात आली.या प्रकरणी गुन्हेगारी पद्धतीने मिळविलेली संपत्ती वैध दाखविल्याच्या आरोपाखाली ही पहिली अटक आहे. व्हीव्हीआयपी ३,६०० कोटी रुपयांची कथित लाच प्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. ईडीने काल खेतानच्या राजधानी दिल्लीतील दोन घरांची झडती घेतल्यानंतर अटक झाली.ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, खेतानला मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यातील तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. काल ईडीने चौकशीदरम्यान, खेतानच्या घरातून सुमारे एक कोटी रुपये मूल्य असलेले दागिने जप्त केले होते. तसेच काही महत्त्वपूर्ण वित्तीय दस्तऐवजही आपल्या ताब्यात घेतले होते. अगुस्ता वेस्टलँडच्या १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहाराची सध्या चौकशी सुरू आहे.सक्तवसुली संचालनालयाने यंदा जुलैमध्ये खेतान, माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी आणि अन्य १९ जणांविरोधात फौजदारी कलमान्वये एफआयआर दाखल केला होता. खेतान हे चंदीगड येथील एअरोमॅट्रिक्स नामक कंपनीच्या संचालक मंडळात होते. हेलिकॉप्टर व्यवहाराच्या आर्थिक देवाण-घेवाणीसाठी कथितरीत्या बनावट कंपनीच्या माध्यमातून काम करण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)