अंबोलीत व्यावसायिकाची आत्महत्या
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
अंबोलीत व्यावसायिकाची आत्महत्या
अंबोलीत व्यावसायिकाची आत्महत्या
अंबोलीत व्यावसायिकाची आत्महत्यामुंबई : अंबोली येथील कैलाश इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून अमित सुभाष सिधवानी(३४) या व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. अमित एका जाहिरात कंपनीचा चालक होता. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेले एक पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. या पत्रात आपल्या मृत्यूस कोणासही कारणीभूत धरु नये; असे त्याने नमूद आहे, असे अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रमेश खडतरे यांनी सांगितले. शिवाय याप्रकरणी त्याच्या व्यावसायिक भागिदाराचा जबाब नोंदविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमुद केले आहे.