कुस्ती आखाड्याचे भूमिपूजन
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
अहमदनगर : राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे शनिवारी नगरसेविका शीतल जगताप यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले़ यावेळी उपमहापौर सुवर्णा कोतकर, अंजली देवकर, नगरसेविका सविता कराळे, शंकराव घुले आदी उपस्थित होते़
कुस्ती आखाड्याचे भूमिपूजन
अहमदनगर : राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे शनिवारी नगरसेविका शीतल जगताप यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले़ यावेळी उपमहापौर सुवर्णा कोतकर, अंजली देवकर, नगरसेविका सविता कराळे, शंकराव घुले आदी उपस्थित होते़ राणी लक्ष्मीबाई कला, क्रीडा प्रतिष्ठान व महानगरपालिका यांच्यावतीने शहरात दि़ १८ ते १९ रोजी जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे़ विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, समारोप सोहळ्याला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे उपस्थित राहणार आहेत़ या स्पर्धेत राज्यातील ४०० महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत़ स्पर्धेत कुस्तीतील ऑलंपिकवीर गीता फोगाट हिची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे़ फोटो आहे़