शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनने भारताची जाहीर माफी मागावी

By admin | Updated: January 16, 2017 05:04 IST

ज्या काही वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल ब्रिटनने भारताची जाहीर माफी मागून पापाचे प्रायश्चित्त घ्यावे, असे मत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले

कोलकाता : भारतावर २०० वर्षे एक वसाहत म्हणून जुलमी शासन करताना ज्या काही वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल ब्रिटनने भारताची जाहीर माफी मागून पापाचे प्रायश्चित्त घ्यावे, असे मत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले.कोलकाता साहित्य महोत्सवाचे उद््घाटन करण्यापूर्वी थरूर स्वत:च्याच ‘अ‍ॅम इरा आॅफ डार्कनेस: दि ब्रिटिश एम्पायर इन इंडिया’ या इंग्रजी पुस्तकाविषयी बोलत होते. या पुस्तकाच्या ब्रिटिश आवृत्तीचे येत्या २ मार्च रोजी प्रकाशन व्हायचे आहे.जुलमी ब्रिटिश राजवटीचा राक्षसी कळस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालियनवाला बाग हत्याकांडाला सन २०१९ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. ते औचित्य साधून साम्राज्यवादी शासक म्हणून केलेल्या अत्याचारांबद्दल प्रायश्चित्त घेण्याची ब्रिटनला नामी संधी आहे,असे सांगून थरूर म्हणाले की, त्यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी किंवा तेथील राजघराण्यातील सदस्याने भारतात येऊन केवळ जालियनवाला हत्याकांडाबद्दलच नव्हे तर एकूणच साम्राज्याच्या शासनकाळात केल्या गेलेल्या कृष्णकृत्यांबद्दल भारतीय नागरिकांची मनापासून माफी मागावी.थरूर म्हणाले की, भारत आणि अन्य वसाहतींमधून ब्रिटिश साम्राज्याने जी लूट केली ती केली गेली नसती तर आज लंडन जसे दिसते तसे दिसलेही नसते. या लुटीची रास्त मोजदाद करता येणार नाही व कोणतीही रक्कम तिची भरपाई करण्यासाठी पुरेशी ठरणार नाही.अशा प्रकारे माफी मागून झालेल्या चुकांची कबुली दिली की मने साफ होतील आणि भारत व ब्रिटनचे संबंध खऱ्या अर्थी दोन सार्वभौम देशांमधील संबंध म्हणून आकाराला येतील, तोपर्यंत या संबंधांना साम्राज्य आणि वसाहत या ऐतिहासिक संबंधांची झालर कायम राहील, असे ते म्हणाले.थरूर म्हणाले की, ब्रिटनचे आजवरचे वागणे नेमके याच्या उलट असल्याचे दिसते. साम्राज्यशाहीचा कटु इतिहास दडपून टाकण्याची ब्रिटिशांची प्रवृत्ती दिसते. इतिहासाला सामोरे जाण्याची त्यांची तयारी नाही. उलट ब्रिटिश इतिहासकार साम्राज्याचे गोडवे गाताना दिसतात. (वृत्तसंस्था)>कॅनडाचे अनुकरण कराया संदर्भात थरूर यांनी कॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांचे उदाहरण दिले व सन १९१४ च्या कोमागाता मारु घटनेबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.