संक्षिप्त
By admin | Updated: May 11, 2014 00:35 IST
डास फवारणीच्या ठेक्यास मुदतवाढ
संक्षिप्त
डास फवारणीच्या ठेक्यास मुदतवाढनाशिक : महापालिकेने आचासंहितेपूर्वी वेळेत निर्णय न घेतल्याने डास निर्मूलन आणि धुराळणीच्या ठेक्यास पुन्हा महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. महापालिकेच्या वतीने डास निर्मूलनाचा खासगी ठेका देण्यात आला आहे. या ठेक्याची मुदत सहा महिन्यांपूर्वी संपली परंतु त्या आधी नवीन निविदांबाबत निर्णय घेतला नसल्याने मुदतवाढ द्यावी लागली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असताना ठेक्याबाबत निर्णय घेतला गेला नाही. दोन दिवसांपूर्वी या ठेक्याची मुदत संपली परंतु शहरात डासांची संख्या वाढत असल्याने पालिकेने अत्यावश्यक बाब म्हणून दोन दिवसांपूर्वीच एका महिन्याची मुदतवाढ द्यावी लागली आहे.कॅनॉलरोडचे काम अर्धवटनाशिक : कृषीनगर जॉगिंग ट्रॅक ते बॉईज टाऊनपर्यंतच्या कॅनॉलरोडचे रस्ता डांबरीकरण पुन्हा एकदा रखडले आहे. सदरच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागत होते. याठिकाणी डांबरीकरण करण्याचे काम ज्या ठेकेदाराला देण्यात आले होते, त्यानेच काम करण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर ठेकेदाराने काम सुरू केले तर आता जलवाहिनीचे काम करण्यासाठी डांबरीकरणाचे काम अडवून ठेवण्यात आले आहे. परिणामी नागरिकांना अर्धवट झालेल्या रस्त्यावरून वाहतूक करावी लागत आहे.पारिजातनगरला अपघात केंद्रनाशिक : पारिजातनगर येथे चौफुलीवर वारंवार अपघात होत असल्याने याठिकाणी वाहतूक बेट विकसित करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. महात्मानगर कडून येणार्या मार्गावर उतार असल्याने वाहने वेगाने येतात. त्याचवेळी चौफुलीवरून अन्य वाहने जात असताना अपघात होतात. त्यामुळे हे अपघात प्रवण केंद्र झाले आहे. याठिकाणी वाहतूक बेट किंवा अन्य उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे.महापौरांच्या दौर्याला मिळेना मुहूर्तनाशिक : सिंहस्थ कामांची पाहणी करण्यासाठी महापौरांनी चालू आठवड्यात नियोजन केले होते. परंतु या आठवड्यात कोणताही दौरा न झाल्याने दौर्याला कधी मुहूर्त लागणार असा प्रश्न आहे. आचारसंहितेमुळे सिंहस्थाची अनेक कामे सुरू आहेत. परंतु अनेक कामांविषयी तक्रारी आहेत. तर काही कामे करण्यास ठेकेदार टाळाटाळ करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर यतिन वाघ यांनी या आठवड्यात दौरा करण्यात येईल असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात दौरा झाला नाही.