थोडक्यात जोड....
By admin | Updated: December 16, 2014 23:44 IST
पाचगाव येथे सिकलसेल जनजागृती शिबिर
थोडक्यात जोड....
पाचगाव येथे सिकलसेल जनजागृती शिबिरउमरेड : तालुक्यातील पाचगाव येथे अनिकेत बहुउद्देशीय संस्थेतर्फे सिकलसेल जनजागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती करण्यात आली. पाचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात शिबिराचे उद्घाटन डॉ. बी. एस. बन्सोड यांनी केले. अध्यक्षस्थानी सरपंच पुण्यशिला मेश्राम होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ज्योत्स्ना कुमरे, आरोग्य अधिकारी विद्यानंद गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मूर, विश्वजीत थूल, माधुरी भिवगडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सिकलसेल आजारावर नियंत्रणासाठी घ्यावयाची काळजी व उपाययोजना यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जयप्रकाश भवसागर यांनी केले. संचालन अजय सनेसर यांनी तर इंद्रपाल गजघाटे यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सोमेश्वर मेश्राम, सुधाकर लोखंडे, बुद्धशिला मेश्राम, प्रकाश गोहणे, सविता बोंदरे, देवचंद मेश्राम, अविनाश भवसागर, मंगेश निखार आदींसह आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)