अंधोरीच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
अहमदपूर : गावातील शेतरस्ता-शिवरस्ता अडला की सगळ्या गावकर्यांची मोठी अडचण होते़ शेतकर्यांचे दैनंदिन व्यवहार अडचणीत येतात़ शेतीचे कामेही खोळंबतात़ अनेकदा पिकलेला शेतीमालही शेतातून बाहेर काढणे कठीण होते़ हीच समस्या अहदपुरातील अंधोरी गावातील ग्रामस्थ सहन करीत होते़ पण ही बाब जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास गावकर्यांनी आणून दिल्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला आहे़
अंधोरीच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास
अहमदपूर : गावातील शेतरस्ता-शिवरस्ता अडला की सगळ्या गावकर्यांची मोठी अडचण होते़ शेतकर्यांचे दैनंदिन व्यवहार अडचणीत येतात़ शेतीचे कामेही खोळंबतात़ अनेकदा पिकलेला शेतीमालही शेतातून बाहेर काढणे कठीण होते़ हीच समस्या अहदपुरातील अंधोरी गावातील ग्रामस्थ सहन करीत होते़ पण ही बाब जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास गावकर्यांनी आणून दिल्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला आहे़अहमदपूर तालुक्यातील अंधोरी गावातील नागरिक गेल्या दहा-बारा वर्षांपासून रस्ता व्हावा म्हणून प्रयत्न करीत होते़ मात्र, त्यास यश येत नव्हते़ या ग्रामस्थांनी अधिकार्यांकडे धाव घेतली, मात्र अधिकार्यांकडून दिलासा मिळाल नाही़ त्यामुळे अखेर गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे धाव घेतली़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी कागदपत्रे तपासून रस्ता खुला करुन देण्याचे आदेश दिले़ त्यामुळे अहमदपूरचे तहसीलदार अवधाने यांच्या नियंत्रणाखाली ३३ फुटांचा दीड किलोमीटर लांबीचा रस्ता खुला करुन देण्यात आला आहे़ अंधोरी गावच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याने शेतकर्यांतून आनंद व्यक्त होत आहे़ अंधोरीतील नागरिकांना ढाळेगावमार्गे अहमदपूरला जाण्यास रस्ता मिळाला असून शेतीची कामे करणे सुलभ झाले आहे़ या ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन सत्कारही केला़