शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

वड्रांविरुद्ध भाजपचा लोकसभेत हक्कभंग

By admin | Updated: July 24, 2015 00:32 IST

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध भाजपने गुरुवारी लोकसभेत हक्कभंगाची नोटीस आणत अधिवेशनात सुरू

हरीश गुप्ता, नवी दिल्लीकाँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध भाजपने गुरुवारी लोकसभेत हक्कभंगाची नोटीस आणत अधिवेशनात सुरू असलेले युद्ध नव्या वळणावर नेऊन ठेवले. वड्रा यांनी मंगळवारी फेसबुक पोस्टवर असंसदीय शब्दाचा वापर केल्याचा मुद्दा लोकसभेत भाजपच्या सदस्यांनी उपस्थित करताच काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार विरोध केल्याने चांगलाच गदारोळ झाला.वड्रा यांच्या फेसबुकवरील पोस्टचा मुद्दा संसदेच्या हक्कभंग समितीकडे सोपविला जावा आणि त्यांना सभागृहात हजर केले जावे, अशी मागणी भाजपचे खासदार अर्जुन राम मेघवाल यांनी मुद्दा उपस्थित करताना केली. काँग्रेसच्या खासदारांनी सुषमा स्वराज, शिवराजसिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत हौद्यात धाव घेतली. वड्रा यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस आणण्याला त्यांनी विरोध केला. अध्यक्ष महाजन यांनी या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगत हा मुद्दा लोकसभेच्या हक्कभंग समितीकडे सोपविला. त्यानंतर हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांचे अ‍ॅपलगेट, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचे स्टिंग आॅपरेशन, आसाम आणि गोव्याचे मुख्यमंत्रीद्वय अनुक्रमे तरुण गोगई आणि कामत यांच्यावर लाचखोरीचा आरोप करीत भाजपाने काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य बनविले. दरम्यान, उत्तराखंडमधील स्टिंगच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.काय म्हणाले वड्रासंसद सुरू होताच लक्ष विचलित करण्याच्या क्षुद्र राजकीय क्लृप्त्या सुरू झाल्या आहेत. भारतातील लोक मूर्ख नाहीत, असे वड्रा यांनी मंगळवारी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले होते.