शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पितळी भांड्यांची चोरी

By admin | Updated: November 29, 2015 23:57 IST

अहमदनगर : कल्याण रोडवरील शंकर वैंकय्या शिरसूल यांच्या घरातून १५ हजार ५०० रुपये किंमतीची पितळी आणि स्टिलची भांडी चोरीला गेली आहेत. ही घटना दोन महिन्यांपासून ते २८ नोव्हेंबर या कालावधीत घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घराच्या खिडकीतून प्रवेश करून अज्ञातांनी ही चोरी केली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : कल्याण रोडवरील शंकर वैंकय्या शिरसूल यांच्या घरातून १५ हजार ५०० रुपये किंमतीची पितळी आणि स्टिलची भांडी चोरीला गेली आहेत. ही घटना दोन महिन्यांपासून ते २८ नोव्हेंबर या कालावधीत घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घराच्या खिडकीतून प्रवेश करून अज्ञातांनी ही चोरी केली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------
टेम्पोतील किराणा माल चोरीला
अहमदनगर : हातमपूरा भागातील बाळू तुळशीराम साठे (रा. धरती चौक) यांच्या टेम्पोतील किराणा माल चोरीला गेल्याची घटना २५ नोव्हेंबरला घडली असून या प्रकरणी शनिवारी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. साठे यांच्या टेम्पोत शेंगदाण्याचे चार कट्टे, पांढर्‍या रंगाची कापडाची गाठ असा ५७ हजार रुपये किंमतीचा किरणा माल चोरीला गेला आहे. टेम्पोचा पाठीमागील पडदा फाडून अज्ञात इसमांनी माल चोरी केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
-----
बोल्हेगावला मटका
अहमदनगर : एमआयडीसी परिसरातील बोल्हेगाव फाटा येथे कल्याण मटका खेळणार्‍या अनिल रत्नाकर घोडके याच्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून ४३० रुपये रोख व मटका खेळण्याचे साहित्य जप्त केले आहे. पोलीस कर्मचारी योगेश ठाणगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------
अपघातात एक ठार
अहमदनगर : चिचोंडी गाव शिवारात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत काशिनाथ किसन खेडकर (वय ६५, रा. उक्कडगाव, ता. नगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता नगर-जामखेड रस्त्यावर चिचोंडी गाव शिवारात घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.