शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आयओएची ‘ब्रँड व्हॅल्यू’ ५०० कोटी

By admin | Updated: July 19, 2016 06:25 IST

स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनविण्याचा निर्धार व्यक्त करून आयओएची स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू ५०० कोटी असल्याची माहिती अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी सोमवारी दिली.

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेला (आयओए) अमेरिकेच्या आॅलिम्पिक समितीसारखेच स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनविण्याचा निर्धार व्यक्त करून आयओएची स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू ५०० कोटी असल्याची माहिती अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी सोमवारी दिली. रिओसाठी जाणाऱ्या भारतीय आॅलिम्पिकपटूंच्या अधिकृत समारोप सोहळ्यात रामचंद्रन म्हणाले, ‘‘आयओएची ब्रँड व्हॅल्यू’ ५०० कोटी असल्याचे ऐकून मलादेखील आश्चर्य वाटले. आयओएला आता अमेरिकेच्या आॅलिम्पिक समितीसारखेच आत्मनिर्भर बनविण्याचे टार्गेट आहे. मदतीसाठी सरकारकडे वारंवार हात पसरावा लागू नये, हा आमचा हेतू आहे. आत्मनिर्भर व्हायचे झाल्यास अमेरिकेच्या आॅलिम्पिक समितीप्रमाणे समर्शियल पार्टनर शोधावे लागतील. त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य घ्यावे लागेल. उत्कृष्टपणा आणायचा असेल तर काळ आणि वेळेनुसार बदलावे लागेल. आॅलिम्पिकच्या तयारीसाठी खेळाडूंना परदेशात सरावाची संधी दिल्याबद्दल मी सरकारचा आभारी आहे. आॅलिम्पिक पदक जिंकण्यासाठी सरकार व आयओएदरम्यान संपूर्ण ताळमेळ असावा, हे आता अनेकांना पटू लागले आहे. याच कारणांमुळे रिओ आॅलिम्पिकसाठी मोठ्या संख्येने खेळाडू पात्र ठरू शकले.’’भारतीय खेळाडूंनी रिओत चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून रामचंद्रन म्हणाले, ‘‘यंदा लंडनच्या तुलनेत अधिक पदके मिळतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.’’ कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा सचिव राजीव यादव, आयओएचे महासचिव राजीव मेहता, कोशाध्यक्ष अनिल खन्ना, रिओसाठी जाणारे भारताचे पथकप्रमुख राकेश गुप्ता उपस्थित होते. (वृत्तसंस्था)