ऑनलाइन टीम
लखनऊ, दि. १३ - गर्लफ्रेंडची अश्लिल चित्रफीत तयार करून तिला धमकी देण्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात पण लखनऊमध्ये एका गर्लफ्रेंडनेच बॉयफ्रेंडचा अश्लिल फोटो टाकून त्याला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे.
लखनऊमधील देवेश शर्मा आणि अंजली (नाव बदलेले आहे ) या दोघांमध्ये काही महिन्यापूर्वीच मैत्री झाली होती. मैत्रीखातर देवेशने अंजलीच्या बहीणीला आपल्या कार्यालयात टेलीकॉलर म्हणून कामाला लावतो असे आश्वासन दिले होते. या कामासाठी दोघे नेहमी भेटत असत. फ्रेंडशिप डे निमित्त हे दोघे एका पार्टीत जाणार असे ठरले पण त्यासाठी देवेशने आपल्याला साडेचार हजार रूपयाचा पर्स आणि ९ हजार रूपयाची स्कर्ट घेवून द्यावी अशी मागणी मुलीने केली. ही मागणी खूप मोठी असल्याने ती देण्यास देवेशने टाळाटाळ केली. व त्यानंतर तिला भेटण्याचे टाळले. ४ ऑगस्ट रोजी अंजलीने जवळजवळ १०० वेळा कॉल केला तसेच ५० हून अधिक मॅसेज पाठवले. २ लाख रूपये दे , तसेच माझ्या बँक खात्यात २० हजार रूपये टाक नाही तर बघ काय होईल अशी धमकी दिल्याचे देवेशने पोलिसांना सांगितले. देवेशने अंजलीच्या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने अंजलीने रागाच्या भरात अश्लिल साईटसवर जावून फोटोमध्ये एडिट करून त्या ठिकाणी देवेशचा चेहरा लावला. देवेश हा गे असून फोटोच्या खाली त्याचा मोबाईल नंबर दिला व हा फोटो नवीन प्रोफाईल तयार करून फेसबुकवर अपलोड केला. ही माहिती देवेशला कळल्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तपास केल्यानंतर हा सर्व प्रकार लक्षात आला. याप्रकरणी अद्याप अंजलीविरूध्द कोणताही गुन्हा नोंदवला नसल्याची माहीती पोलिसांनी दिली.