ईस्टर्न...विक्रोळीत कारच्या धडकेत दोघे जखमी
By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST
ईस्टर्न...फोटोसह...फोटो चांगले आहेत... विक्रोळीत कारच्या धडकेत दोघे जखमीकारवर आमदाराचे फलकविक्रोळी: विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील दोन कारमध्ये झालेल्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना समोर आली. त्यात धडक देणार्या कारवर विधानपरिषद आमदार असे नमूद करण्यात आल्यामुळे ही कार आमदाराची असल्याचा पोलिसांचा कयास आहे. या अपघातात कैलास अनम आणि वनिता हिरा ...
ईस्टर्न...विक्रोळीत कारच्या धडकेत दोघे जखमी
ईस्टर्न...फोटोसह...फोटो चांगले आहेत...विक्रोळीत कारच्या धडकेत दोघे जखमीकारवर आमदाराचे फलकविक्रोळी: विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील दोन कारमध्ये झालेल्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना समोर आली. त्यात धडक देणार्या कारवर विधानपरिषद आमदार असे नमूद करण्यात आल्यामुळे ही कार आमदाराची असल्याचा पोलिसांचा कयास आहे. या अपघातात कैलास अनम आणि वनिता हिरा हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुलुंडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.बुधवारी रात्री अडीचच्या सुमारास कैलास अनम हे एम एच ०३ बीजे ४१४१ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर घेवून मुंबईकडून ठाण्याच्या दिशेला जात होते. त्यांंच्या गाडीवर विधानपरिषदेचे आमदार लिहिलेले स्टीकरही आहे. त्याचदरम्यान विक्रोळी फिरोजशहा पुलाकडून वळण घेतेवेळी त्यांंचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि समोरुन येणार्या गाडीला धडक देत पुढे डिवायडरला जाऊन धडकले. या अपघातात ठाण्याकडून मंुबईच्या दिशेने जाणारे कार्तिक संुदरम किरकोळ जखमी झाले. तर अनम आणि वनिता हिरा हे दोघेही गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात कैलास अनम यांंच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालविण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश देसाई यांनी दिली. तसेच गाडी ही आमदारांंची आहे, की टोल चुकविण्यासाठी अनमने बनावट स्टीकर लावले, याचा तपासही सुरु असल्याचे देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)