शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पान टपरी फोडताना दोघांना रंगेहाथ पकडले शनी मदिंराजवळील घटना : रोख रक्कम व साहित्य हस्तगत

By admin | Updated: February 5, 2016 22:22 IST

फोटो...

फोटो...
जळगाव : पान टपरी फोडून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या सागर प्रकाश पवार (शनी पेठ) व अक्षय आनंद जावळे (वय २० रा.गुरुनानक नगर, शनी पेठ) या दोघांना शनी मंदिराजवळ शनी पेठ पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजता रंगेहाथ पकडले. दोघांना अटक करण्यात आली असून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शनी मंदिराजवळ गणेश मोहन गवळी (वय ३९ रा.शनी पेठ) यांच्या मालकीची श्रीकृष्ण पान सेंटर म्हणून टपरी वजा दुकान आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजता एका पोलीस मित्राने ही पानटपरी दोन फोडत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांना मोबाईलवरुन दिली. घरी असलेल्या प्रधान यांनी क्षणाचा विलंब न करता रात्रीच्या ड्युटीला असलेल्या गुन्हे शोध पथकाला घटनास्थळी पाठविले. तेथे अक्षय जावळे व सागर प्रकाश या दोघांनी पान टपरी फोडलेली होती. त्यातील रोख रक्कम व साहित्य घेऊन पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. पोलीस स्टेशनला आणून दोघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन हजार रुपयांची चिल्लर, दहा रुपयाच्या वीस नोटा अशी दोन हजार दोनशे रुपये रोख, अर्धा तोळ्याचे दोन तर एक तोळ्याचा एक असे चांदीचे तीन सिक्के, सिगारेट व कुलूप आदी मुद्देमाल त्यांच्याजवळ मिळून आला.
इन्फो..
जावळेचा हद्दपारीचा प्रस्ताव
आकाश जावळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी दिली. दरम्यान, चौबे शाळेजवळील किराणा दुकानातील चोरीच्या प्रकरणातील संशयित पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्याला अटक केली जाणार असल्याचे प्रधान म्हणाले.