शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आणि मोदी सरकार दोघेही ‘दुतोंडी’

By admin | Updated: December 2, 2014 08:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे दुतोंडी पक्षाचे सरकार आहे. भाजपा विरोधी पक्षात असताना एक बोलते आणि सत्तेत आल्यावर त्याच्या अगदी उलट बोलते.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे दुतोंडी पक्षाचे सरकार आहे. भाजपा विरोधी पक्षात असताना एक बोलते आणि सत्तेत आल्यावर त्याच्या अगदी उलट बोलते. भाजपाच्या उक्ती आणि कृतीत मोठा विरोधाभास आहे. खऱ्या अर्थाने हे ‘यू टर्न’ सरकार आहे, असा घणाघाती आरोप करीत काँग्रेसने सोमवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी ‘सहा महिने पार, यू टर्न सरकार’ मथळ्याखाली एक पुस्तिका प्रकाशित करून भाजपा आणि मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मोदी आणि त्यांच्या सरकारने सत्तेत आल्यापासून ज्या मुद्द्यांवर घूमजाव केलेले आहे, असे एकूण २२ मुद्दे या पुस्तिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. मागच्या तीन दिवसांतच असे तीन मुद्दे पुढे आले आहेत, की ज्यावर मोदी आणि त्यांच्या पक्षाने आपली जुनी भूमिका बदलून घूमजाव केले आहे आणि काँग्रेसप्रणीत संपुआ सरकार जे काही सांगत होते, तेच आता मोदी सरकार सांगत आहे. कॅग, रेल्वे भाडेवाढ, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांपासून संसदेला मुक्त करणे आदी मुद्द्यांवर मोदींनी देशाला मोठमोठे उपदेश दिले आहेत, पण आज परिस्थिती कशी आहे? शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नाही. मोदी सरकारमध्ये गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असलेले आणि गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल असलेले २१ मंत्री आहेत. हे यू टर्न नाही तर काय आहे, असा सवाल माकन यांनी केला. मोदी, त्यांचे मंत्री आणि भाजपा केवळ खोटे बोलून सत्तेत आल्याचा आरोप माकन यांनी या वेळी केला. दिल्लीत निवडणुका जवळ असल्यानेच मोदी सरकारने १९८४च्या दंगलग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे, असा आरोप त्यांनी केला.>विविध मुद्द्यांवर भाजपा व मोदी यांनी व्यक्त केलेले मत आणि कालांतराने त्याच मुद्द्यांवर त्यांनी कसे घूमजाव केले, हे सांगणारे प्रसंग काँग्रेसने पुस्तिकेत दिले आहेत.