शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये संघाच्या कार्यालयावर फेकला बॉम्ब, 3 कार्यकर्ते जखमी

By admin | Updated: March 3, 2017 04:16 IST

केरळमधील कलाच्चीमध्ये स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी बॉम्ब फेकल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ऑनलाइन लोकमततिरुवनंतपुरम,  दि. 3 - केरळमधील कलाच्चीमध्ये स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संघाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. जखमी कार्यकर्त्यांना कोझिकोडमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र संघाच्या कार्यालयावर बॉम्ब कोणी फेकला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे केरळमध्ये डावे आणि संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाच्या अनेक घटना घडत असतात. या प्रकारानंतर संघ विचारक राकेश सिन्हा यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची फूस असल्यामुळेच डाव्यांकडून हिंसात्मक कारवाई केली जाते. त्यानंतर सिन्हा यांनी केंद्रीय गृहमंत्रालयानं केरळ सरकारवर सल्लागार समिती नेमावी, अशी मागणी केली आहे. तसेच केरळमधील लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केरळचा दौरा करावा, असंही ते म्हणाले आहेत.
(केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणा-याला 1 कोटी देईन - RSS नेता)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कुंदन चंद्रावत यांनी जो कोणी केरळचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा शिरच्छेद करेल त्याला 1 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा हल्ला झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मात्र स्वयंसेवक संघाकडून कुंदन चंद्रावत यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. तसेच संघ कधीच हिंसात्मक कारवाईचे समर्थन करणार नसल्याचंही संघानं स्पष्ट केलं आहे.