शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

‘बोफोर्स’ हा मीडिया ट्रायल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2015 02:00 IST

बोफोर्स घोटाळा ही ‘एक मीडिया ट्रायल’ होती आणि बोफोर्स कंपनीकडून हॉवित्झर तोफांच्या खरेदीच्या त्या सौद्यात गैरव्यवहार झाल्याचा निकाल देशातील कोणत्याही न्यायालयाने अद्याप दिलेला नाही.

राष्ट्रपतींचा निर्वाळा : गैरव्यवहार नाहीनवी दिल्ली : बोफोर्स घोटाळा ही ‘एक मीडिया ट्रायल’ होती आणि बोफोर्स कंपनीकडून हॉवित्झर तोफांच्या खरेदीच्या त्या सौद्यात गैरव्यवहार झाल्याचा निकाल देशातील कोणत्याही न्यायालयाने अद्याप दिलेला नाही. प्रसिद्धिमाध्यमांनी या प्रकरणाला अवाजवी प्रसिद्धी देऊन त्याचा उगाच बाऊ केला आहे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. स्वीडन दौऱ्यापूर्वी स्वीडनमधील एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मुखर्जी यांनी हे मत व्यक्त केले. ‘बोफोर्स सौद्यात कुठलाही घोटाळा झाला नाही, हे मी सर्वप्रथम स्पष्ट करायला हवे, असे सांगून मुखर्जी म्हणाले, ‘बोफोर्स व्यवहार झाल्यानंतर काही वर्षांनी मी संरक्षणमंत्री बनलो आणि भारताला मिळालेली ही सर्वोत्तम तोफ असल्याची पावती माझ्या सर्व जनरल्सनी त्या वेळी दिलेली होती. भारतीय लष्कर आजतागायत या बोफोर्स तोफा वापरत आहे. ज्या तथाकथित घोटाळ्याबद्दल तुम्ही बोलत आहात त्याबाबतची चर्चा अर्थातच मीडिया करीत असते. मीडियाने त्याला अवाजवी प्रसिद्धी दिली. ती मीडिया ट्रायल होती. एवढी प्रसिद्धी कुणाला देऊ नये असे मला वाटते.’‘बोफोर्स तोफा चांगल्या आहेत, असे प्रमाणपत्र मी देऊ शकतो. परंतु राष्ट्रपतींच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. तुम्ही बोफोर्सच्या दर्जाबाबत मला विचारत असाल तर मी एवढेच सांगेन की या तोफा सर्वोत्कृष्ट आहेत,’ असे पर्रीकर यांनी पत्रकारांना सांगितले.