शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण झालेल्या चिमुरडीचा मृतदेह सापडला विहिरीत कारण अद्याप गुलदस्त्यात : गुन्‘ाचे कलम वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 00:42 IST

जळगाव: अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या सुप्रीम कॉलनीतील संजना दिलीप साळुंखे या आठ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह बुधवारी सकाळी पिंप्राळा शिवारातील विहिरीत आढळून आला आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली असली तरी मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनला या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे, तर रामानंदला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे, एमआयडीसीच्या गुन्‘ात खुनाचे कलम वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव: अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या सुप्रीम कॉलनीतील संजना दिलीप साळुंखे या आठ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह बुधवारी सकाळी पिंप्राळा शिवारातील विहिरीत आढळून आला आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली असली तरी मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनला या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे, तर रामानंदला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे, एमआयडीसीच्या गुन्‘ात खुनाचे कलम वाढण्याची शक्यता आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्‘ात संशयित आरोपी समाधान लोटन बडगुजर (रा.पिंपळकोठा ता.एरंडोल) याला अटक करण्यात आलेली आहे, मात्र आपण मुलीचे अपहरण केले नसल्याच्याच कारणावर अद्याप ठाम आहे, त्यामुळे खरे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
लस्सी पाजण्याच्या नावाखाली बडगुजर हा संजना तिचा भाऊ विकी, जितू व बहीण कोमल आदी जणांना घेवून गेला होता. नंतर संजना वगळता या तिघांना गुजराल पेट्रोल पंपाजवळून एका रिक्षात बसवून सुप्रीम कॉलनीत रवाना केले होते. त्यानंतर संजना व बडगुजर गायब झाल्याची तक्रार मुलीच्या आईने दिल्यावरुन पोलिसांनी बडगुजरविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
विद्युत पंप सुरू करताना आढळला मृतदेह
पिंप्राळा शिवारातील संत मिराबाई नगरात अनिल भिमसिंग पाटील यांच्या मालकीची विहीर आहे. त्याचा विद्युत पंप सुरू करण्यासाठी पाटील हे सकाळी आठ वाजता शेतात गेले असता विहिरीजवळ दुर्घंधी येत होती. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एका मुलीचा मृतदेह त्यात दिसून आला. त्यांनी ही माहिती पोलीस पाटलाच्या माध्यमातून रामानंद नगर पोलिसांना कळविली.
पोलिसांची दमछाक
घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक नरवाडे, प्रदीप चौधरी, शरद पाटील आदींनी घटनास्थळ गाठले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी तेथील निरीक्षक सुनील कुराडे यांच्याशी संपर्क साधून मृतदेहाबाबत माहिती दिली. कुराडे यांनी याच गुन्‘ाच्या तपासासाठी एरंडोलला असलेले सहायक निरीक्षक सचिन बागुल व रामकृष्ण पाटील यांना व्हॉटस्ॲप फोटो पाठवून मृतदेहाबाबत कळविले. त्यांनी तेथून माघारी फिरत घटनास्थळ गाठले. त्यांनीही हे फोटो मुलीचे मामा व आईला दाखविले.