शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निवडणुकीत निळ्या चिमण्यांचा टिवटिवाट

By admin | Updated: October 16, 2015 23:30 IST

आरोप - प्रत्यारोपाने गाजत असलेल्या बिहार निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मैदानापेक्षा ट्विटरवरच एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहेत.

सतीश डोंगरे आरोप - प्रत्यारोपाने गाजत असलेल्या बिहार निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मैदानापेक्षा ट्विटरवरच एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत वा माजी मुख्यमंत्री नितीशकुमार, लालूप्रसाद यादव असोत, ही सगळीच मंडळी ट्विटरवर एकमेकांवर हल्लाबोल करीत आहेत. दिवसाला सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक ट्विट निवडणुकीवर आधारित असल्याने प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ‘ट्विट वॉर’ आणखी पेटण्याची शक्यता आहे. निवडणुकांमध्ये सोशल मीडिया प्रभावी ठरत असल्याने सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी या माध्यमांवर तुटून पडत आहेत. बरेच पक्ष या काळात प्रचारासाठी स्वतंत्र अकाउंट््स, पेजेस तयार करून त्यावर दिवसातील प्रत्येक घडामोडी अपडेट करीत असतात. काही पक्षांकडून तर याकामी तज्ज्ञांची स्वतंत्र टीमच तयार केली जाते. नेमका हाच कित्ता बिहार निवडणुकीत गिरविला जात आहे. सभा, बैठका, रॅली, प्रत्यक्ष गाठीभेटींबरोबरच सोशल मीडियांवरील प्रचारासाठी दिग्गज नेतेमंडळी आसुसलेली असल्याचे बघावयास मिळत आहे. त्यात ट्विटर अधिक प्रभावी ठरत असून, निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच ट्विटरवर शाब्दिक चकमक चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलाआहे. यामध्ये सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले ट्विट म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बिहारींच्या डीएनए’बाबत केलेले वक्तव्य होय. हे ट्विट सर्वाधिक वेळा रिट्विट करून नीतिशकुमार व लालू यांनी मोदींच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला, तर मोदींचे बिहार पॅकेज हे दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक वादग्रस्त ट्विट ठरले.केवळ बिहारमधूनच नव्हे तर देशभरातील विविध प्रादेशिक पक्षांच्या नेतेमंडळींनी मोदींच्या या पॅकेजवर ट्विटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली, तर नीतिशकुमार, लालू यांच्या जंगलराजवरून उपस्थित केला जात असलेला मुद्दाही ट्विटवरूनच छेडला गेला. तसेच दादरी प्रकरणावरून मौन बाळगल्याने टीकेचे धनी ठरत असलेल्या मोदींनी ट्विटवरूनच मौन सोडले. या ट्विट वॉरमध्ये माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, असदुद्दीन ओवेसी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉँग्रेस नेते दिग्विजय सिंग, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, सुशीलकुमार मोदी, रामकृपाल यादव, गिरीराज सिंग आदी आघाडीवर आहेत.