शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही - पंतप्रधान

By admin | Updated: September 26, 2016 17:45 IST

रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे सूचक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.मोदींनी सोमवारी बैठक घेऊन पाकिस्तान सोबत झालेल्या सिंधू पाणी वाटप कराराचा आढावा घेतला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २६ - रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे सूचक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी जलखात्याच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेऊन जागतिक बँकेच्या मध्यस्थीने पाकिस्तान सोबत  झालेल्या सिंधू पाणी वाटप कराराचा आढावा घेतला. 
 
मोदी यांनी या विधानामधून पाकिस्तानवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव एस.जयशंकर, पाणी खात्याचे सचिव आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
 
आणखी वाचा 
 
उरीमध्ये लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू  पाणी वाटप करार रद्द करण्याची मागणी होत आहे. कुठलाही करार एकतर्फी नसतो. त्यात परस्पर विश्वास असला पाहिजे असे परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 
 
1960 मध्ये दोन्ही देशांमध्ये सिंधू पाणी वाटप करार झाला होता. जर हा करार भारताने तोडला तर पाकिस्तानात पाण्यासाठी हाहाकार माजेल. जर हे पाऊल भारताने उचललं तर ते पाकिस्तानवर अणू बॉम्ब टाकल्यासारखं असेल.या करारानुसार जम्मू-काश्मीरमधून वाहणा-या सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचं पाणी पाकिस्तानला जातं. 
 
मात्र, हे पाणी जम्मू-काश्मीरच्या लोकांना वापरता येत नाही. सिंधु नदीवर बांध बांधायचा असेल तरी पाकिस्तानची परवानगी घ्यावी लागते. आता जम्मू-काश्मीरच्या नागरिकांसोबतच अनेक नेतेही हे मानतात की, हा करार भारताने तोडावा.