शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

ओळखीसाठी ‘ब्लॅक कॉर्नर’ नोटीस

By admin | Updated: January 12, 2016 04:30 IST

पाकिस्तानवर दबाव वाढविण्याच्या रणनीतीनुसार पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची ओळख पटविण्यासाठी इंटरपोलच्या माध्यमातून ‘ब्लॅक कॉर्नर’

नवी दिल्ली : पाकिस्तानवर दबाव वाढविण्याच्या रणनीतीनुसार पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची ओळख पटविण्यासाठी इंटरपोलच्या माध्यमातून ‘ब्लॅक कॉर्नर’ नोटीस जारी केली जाणार असताना हल्ल्याच्या स्थळी आणखी एक मोबाईल सापडल्यामुळे हल्ल्याचे पाकिस्तानशी असलेले धागेदोरे जुळविण्याच्या कामाला गती मिळाली आहे.शोधमोहिमेदरम्यान तपास चमूला मोबाईल फोनसह एके-४७ रायफल आणि एक दुर्बीण आढळून आली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पंजाबमधील साक्षीदारांची चौकशी सुरू केली असल्याचे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. हल्ल्याचा सीमापार संबंध पाहता भारताने २ जानेवारी रोजी पाकिस्तानला अतिरेक्यांच्या सहभागासंबंधी काही दस्तऐवज आणि पुरावे सादर केले आहेत. याच मालिकेत इंटरपोलने नोटीस जारी करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने पाकिस्तानला पुरावे देतानाच कठोर कारवाईची मागणी केल्यामुळे दोन देशांदरम्यान १५ जानेवारी रोजी होणारी सचिव स्तरावरील चर्चा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली आहे. एनआयएने गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांची सोमवारी सुरू केलेली चौकशी मंगळवारीही कायम राहणार आहे. त्यांचे मित्र राजेश वर्मा, खानसाम्यालाही दिल्लीत पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)पाक सीमेलगत हाय अलर्टपाकिस्तानी अतिरेकी संघटनांकडून हल्ल्यांचा धोका लक्षात घेता भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या सर्व संरक्षण संस्थांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी एका उच्चस्तरीय बैठकीत देशातील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. संरक्षण संस्थांची सुरक्षा वाढविण्यावर भर दिला जात आहे.एनआयएकडे ३ प्रकरणेएनआयएने तीन प्रकरणांचा तपास हाती घेतला आहे. पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांचे अपहरण आणि टॅक्सीचालकाच्या हत्येसंबंधी दोन प्रकरणांचा त्यात समावेश आहे. तिसरे प्रकरण पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यासंबंधी म्हणजे मुख्य गुन्ह्णांसबंधी असून पठाणकोट पोलीसठाणे विभाग दोन मध्ये नोंदण्यात आले आहे.सलविंदरसिंग एनआयएसमोर हजरपंजाबचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांनी सोमवारी पठाणकोट हल्ल्याबाबत तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेसमोर(एनआयए) हजेरी लावली. ते पंजाब सशस्त्र पोलीस दलाच्या ७५ व्या बटालियनचे सहायक कमांडंट आहेत.सलविंदरसिंग यांनी एनआयए आणि पंजाब पोलिसांना दिलेल्या निवेदनात विसंगती आढळल्यामुळे त्यांच्यावर सखोल चौकशीला सामोरे जाण्याची पाळी आली आहे. त्यांची सत्यमापन चाचणी (लायडिटेक्टर टेस्ट) होण्याची शक्यताही नाकारण्यात आलेली नाही. अलीकडेच शिस्तभंगाच्या कारवाईमुळे सलविंदरसिंग यांना गुरुदासपूरच्या मुख्यालयातून हटविण्यात आले होते. पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याबाबत एनआयएने तीन गुन्हे दाखल केले आहेत.