शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे मिशन यूपी!

By admin | Updated: June 14, 2016 04:55 IST

आसाम विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

अलाहाबाद : आसाम विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हे मिशन उत्तर प्रदेशच असून, अलाहाबादमधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने त्यावर शिक्कामोर्तबच करण्यात आले आहे. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी मिशन उत्तर प्रदेशची जणू अधिकृत घोषणा व सुरुवातच केली. या सभेत मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशनेच भाजपाला केंद्राची सत्ता दिली. ते ऋण फेडण्यासाठी आम्हाला उत्तर प्रदेशला विकासाच्या मार्गावर न्यायचे आहे. येथील भ्रष्टाचार, वशिलेबाजी आणि गलिच्छ राजकारण संपवण्याची इच्छा आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील जनतेने आम्हाला सत्ता दिली, तरच हे शक्य होईल. याच राज्याने देशाला पंतप्रधान आणि गृहमंत्री दिले आहेत. पाच वर्षांत इथे बदल घडवून दाखवू. तो क़रून दाखवला नाही, तर आम्हालाही लाथ मारून दूर करा. पण आधी संधी द्या. (वृत्तसंस्था)उत्तर प्रदेशही विकासाच्या मार्गावर नेऊ- समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांना पाळीपाळीने सत्ता देण्याचे येथील जनतेने बंद करा. राज्यात धर्मांधता, जातीयता वाढविणाऱ्या पक्षांना स्थान असता कामा नये. - भ्रष्टाचार व वशिलेबाजी संपल्याशिवाय राज्य विकासाकडे वाटचाल करू शकणार नाही. त्यासाठी आम्हाला सत्ता द्या. आम्ही गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांना जसे विकासाच्या मार्गावर नेले, तसेच इथेही करून दाखवू.हाताला मिळेल काम!केंद्राच्या अनेक योजनांचा उल्लेख करीत मोदी यांनी सांगितले की, आमचे सरकार आल्यानंतरच परकीय गंगाजळीमध्ये वाढ झाली, जे साठ वर्षांत झाले नव्हते, ते आम्ही अवघ्या दोन वर्षांत करून दाखवले आहे. उत्तर प्रदेश मागे राहण्यास सपा आणि बसपाच कारणीभूत आहेत. प्रादेशिक, संकुचित वृत्तीने उत्तर प्रदेश पुढे जाणार नाही. त्यांना घरी बसवून भाजपाकडे सत्तेची सूत्रे दिल्यास कृषी, उद्योग क्षेत्रांत राज्य पुढे जाईल आणि बेरोजगारांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल.