हरीश गुप्ता - नवी दिल्ली
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसमोर अटी ठेवून जेरीस आणण्याचा घाट घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी ठरवलेल्या व्यूहरचनेनुसार भाजपा राज्यात शिवसेनेला सोबत घेऊन 5क् टक्क्यांपेक्षा कमी जागा लढणार नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदाबाबतही तडजोड करायची नाही, असे त्यांनी ठरविल्याचे समजते.
मोदी आणि शाह यांच्या निकटवर्तीय सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध नेत्यांशी व्यापक चर्चेच्या फे:या घेतल्या. फडणवीस यांनी यापूर्वी अमित शाह यांच्याशी यापूर्वीही अनेकदा चर्चा केली आहे, तसेच मोदी यांच्याशीही दोन वेळा सविस्तर चर्चा केली आहे. विशेष म्हणजे या चर्चेमध्ये पक्ष सरचिटणीस राजीव प्रताप रुडी यांच्यासह कोणत्याही केंद्रीय नेत्याला सहभागी करून घेण्यात आले नाही. तथापि, भूपृष्ठ वाहतूक व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी या निर्णय प्रक्रियेत सहभागी होते ते महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आणि नागपूर लोकसभेचे खासदार असल्याने त्यांचाही यात सहभाग होता.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोदी-शाह-फडणवीस या त्रिमूर्तीने राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर फडणवीस यांनी अमित शाह यांची काल भेट घेतली. या दोहोंनी सविस्तर व्यूहरचना, संभाव्य समीकरणो आणि पर्याय यांच्यावर चर्चाही केली.
भाजपा आता महाराष्ट्रात लहान भावाची भूमिका बजावणार नाही, तसेच यापूर्वी केली तशी मुख्यमंत्रिपदाबाबत आता तडजोड करणार नाही, असेही पक्षश्रेष्ठींनी ठरवले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या असल्या तरी त्यासाठी त्यांना मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचा निश्चितच फायदा झाला. त्यामुळे शिवसेनेने कोणतेही पाऊल उचलण्याआधी या वास्तवाचा विचार केला पाहिजे. शिवसेना भाजपाला 144 जागा देणो कबूल होण्यासारखे नाही; परंतु त्याचबरोबर विधानसभेच्या आखाडय़ात एकटय़ाने उतरण्याचे धाडसही दाखवण्याची शक्यता नाही. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी भाजपाने सेनेला 16 ऑगस्टची डेडलाइन दिली असल्याचेही समजते.
मोदींनी आज रात्री महाराष्ट्राच्या खासदारांना मेजवानीचे आवतन दिले आहे. या वेळी राजकीय स्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मोदी प्रत्येक राज्यातील खासदारांशी बैठका घेत आहेत, ही मेजवानी त्याचाच एक भाग आहे.
च्राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या युतीत या घडामोडी सुरू असतानाच सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्येही शरद पवार यांना 144 जागा हव्या असल्याने घमासान सुरू आहे. 2क्क्9मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 114 जागा लढविल्या होत्या; परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाने 3क् जागा जास्त मागितल्या आहेत. याबाबतचा निर्णय काँग्रेस लांबणीवर टाकत आहे; परंतु काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक होऊन सर्वकाही मार्गी लागेल, अशी शक्यता आहे. कारण काँग्रेसला संपुआमध्ये फाटाफूट नको आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर उद्भवलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात राष्ट्रवादी एकला चलोरेच्या बाजूने आहे.
च्दरम्यान, महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यातील स्थितीबाबत विजय दर्डा यांनी सोनिया गांधी यांना या भेटीत माहिती दिली.