शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा आज देशभर ‘विजय दिन’

By admin | Updated: February 25, 2017 00:33 IST

महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेला शानदार विजय तसेच ओडिशाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधे दमदार उपस्थिती दाखवून दिल्यामुळे

सुरेश भटेवरा , नवी दिल्लीमहाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेला शानदार विजय तसेच ओडिशाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधे दमदार उपस्थिती दाखवून दिल्यामुळे नोटाबंदीला देशातल्या जनतेचा पाठिंबा आहे हा संदेश देशभर देण्यासाठी भाजपातर्फे उद्या, २५ फेब्रुवारीला देशभर जिल्हा मुख्यालयात विजय दिवस साजरा केला जाणार आहे.उत्तर प्रदेशात ३ टप्प्यांचे मतदान अद्याप बाकी आहे. या काळात विशेषत: पूर्वांचलातल्या मतदारांना लक्ष्य बनवून महाराष्ट्रातल्या विजयाचा प्रचार घडवला जाईल याचे संकेत पंतप्रधानांच्या सभांमधून मिळत आहेत. मुंबई व महाराष्ट्रातले २६ टक्के मतदार पूर्वांचलशी संबंधित आहेत. गोंडा येथील सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस साफ झाला आहे. तो कुठेही दिसत नाही. ओडिशा, मुंबई व महाराष्ट्रासह चंदीगडच्या निवडणुका, गुजरातच्या पंचायतींसह कर्नाटकातल्या निवडणुकांचे निकाल पाहा, गेल्या तीन महिन्यांत जिथे निवडणुका झाल्या, तिथे जनतेने भाजपाला भरभरून मतदान केले आहे. मुंबई, महाराष्ट्र, चंदीगड, ओडिशात भाजपाने जिंकलेल्या जागा व अन्य पक्षांना मिळालेल्या जागांच्या तुलनात्मक तक्त्याचा सोशल मीडियासह तमाम माध्यमातून जोरदार प्रचार घडवण्याबरोबर विजय दिनाच्या निमित्त पोस्टर्स सर्वत्र झळकवण्याचा भाजपाचा इरादा आहे.