शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-पीडीपी सरकार अवघड

By admin | Updated: March 19, 2016 01:34 IST

भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी यांच्यातील बोलणी फिसकटल्यामुळे काश्मीरमध्ये सरकार बनण्यातील अडथळे वाढत चालले आहेत. शुक्रवारची

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी यांच्यातील बोलणी फिसकटल्यामुळे काश्मीरमध्ये सरकार बनण्यातील अडथळे वाढत चालले आहेत. शुक्रवारची बोलणी अयशस्वी ठरली, असे पीडीपीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले, तर पीडीपीच्या नव्या मागण्या मान्य करणे शक्य नाही, असे भाजपचे नेते राम माधव यांनी जाहीर केले.मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर काश्मीरमध्ये या दोन पक्षांचे सरकार बनू शकलेले नाही. पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा सईद सतत नवनव्या अटी घालत असून, त्यामुळे सरकार बनण्यात अडचणी येत असल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत; मात्र मेहबुबा मुफ्ती यांच्या नेमक्या काय अटी आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप आणि पीडीपी हे दोन्ही पक्ष अटी वा मागण्या याबाबत जाहीरपणे काहीही बोलायला तयार नाहीत. आम्ही कोणत्याही नव्या अटी घातलेल्या नाहीत, मुफ्ती मोहंमद सईद असताना जे ठरले होते, त्या अटीनुसारच सरकार बनवावे, असे आमचे म्हणणे आहे, एवढेच पीडीपीच्या प्रवक्त्याने सांगितले; मात्र पीडीपीच्या नव्या अटी मान्य करणे अशक्य असल्याचे राम माधव यांनी आजच्या चर्चेनंतर स्पष्ट केले. त्यामुळे काश्मीरमध्ये या दोन पक्षांचे सरकार पुन्हा बनणार का, हा प्रश्नच आहे. या दोन पक्षांना एकत्र येऊन सरकार बनवता येत नसेल, तर राज्यात नव्याने विधानसभेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी यापूर्वीच केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)