शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडचा कौल भाजपाला; जम्मू-काश्मीर त्रिशंकू?

By admin | Updated: December 21, 2014 02:33 IST

झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल तर जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा राहील, असा अंदाज विविध टीव्ही वाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी मतदानोत्तर सर्वेक्षणातून (एक्झिट पोल) वर्तवला आहे.

‘एक्झिट पोल’चा अंदाजनवी दिल्ली : झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल तर जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा राहील, असा अंदाज विविध टीव्ही वाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी मतदानोत्तर सर्वेक्षणातून (एक्झिट पोल) वर्तवला आहे.या दोन राज्यांमधील मतदानाचा पाचवा व अखेरचा टप्पा शनिवारी संपताच एक्झिट पोलचे निष्कर्ष जारी होऊ लागले. झारखंडमधील जनतेने नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारत तर काश्मिरींनी फुटीरतावाद्यांचे बहिष्काराचे आवाहन हाणून पाडत विक्रमी मतदान केले. झारखंडमध्ये पाचही टक्के मिळून सरासरी ६६ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २५ वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ७६ टक्के मतदान नोंदले गेले. दोन्ही ठिकाणी शांततेत निवडणूक पार पडणे ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. दोन्ही राज्यांमध्ये मंगळवार २३ डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू होऊन दुपारपर्यंत निकाल जाहीर होतील.एबीपी न्यूज-नेल्सनने वर्तवलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार झारखंडमध्ये भाजपाला ८१ पैकी ५२ जागा मिळतील. सी-व्होटरने जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवतानाच पीडीपी हा पक्ष ८७ पैकी ३२ ते ३८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असा दावा (पान ८ वर)जम्मू्-काश्मीरमधील मतदानाची एकूण टक्केवारी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशी आहे. या राज्यामध्ये अखेरच्या टप्प्यात ७६ टक्के मतदान झाले. झारखंडमध्येही अखेरच्या टप्प्यात विक्रमी ७१ टक्के मतदानाची नोंद झाली.- विनोद झुत्सी, निवडणूक उपायुक्त