शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्येही भाजपा सरकार?

By admin | Updated: March 12, 2017 19:28 IST

भाजपाला गोवा आणि मणिपूरमध्ये मात्र निराशेचा सामना करावा लागला होता . मात्र या दोन्ही राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपाने सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ऑनलाइन लोकमत
इंफाळ, दि. 12 - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठे बहुमत मिळालेल्या भाजपाला गोवा आणि मणिपूरमध्ये मात्र निराशेचा सामना करावा लागला होता . मात्र या दोन्ही राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपाने सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाचे महासचिव राम माधव यांनी मणिपूरमध्ये सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा पक्षाला मिळेल असा दावा केला आहे.
एकीकडे गोव्यातील मगोप आणि गोवा फॉर्वड ब्लॉक या पक्षांशी बोलणी सुरू असतानाच मणिपूरमध्येही काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे.  "मणिपूरमध्ये भाजपाला चांगला जनाधार मिळाला आहे. आता इतर पक्षांनी सहकार्य केल्यास सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला आकडा आम्ही गाठू," असे माधव यांनी सांगितले.  तसेच मणिपूरमधील जनतेने ओकाराम इबोबी सिंग यांच्या सरकारविरोधात कौल दिला आहे, असा दावाही माधव यांनी केला आहे.  
मणिपूरमधील सत्ताधारी काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या असल्या तरी त्या पक्षाला तिथे बहुमतापेक्षा ४ जागा कमी मिळाल्या आहेत. दुसरीकडे भाजपाने 22 जागा जिंकल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेसलाच सरकार स्थापनेसाठी राज्यपाल बोलावण्याची शक्यता आहे. मात्र यापुढे तेथील सरकार अस्थिर राहण्याचीच चिन्हे आहेत. मात्र तिथे सलग चौथ्यांदा काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. मात्र भाजपानेही सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्याने पूर्वोत्तर राज्यातील सत्तेचे गणित चुरशीचे बनले आहे.