शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारकडे भाडं कमी करण्यासाठी सौदा केला नाही- प्रियंका गांधी

By admin | Updated: April 17, 2016 08:16 IST

ल्लीतल्या त्या घरासाठी केंद्र सरकारच्या नियमानुसारच भाडं भरत असल्याचं यावेळी प्रियंका गांधींनी सांगितलं.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १७- सोनिया गांधींच्या कन्या प्रियंका गांधी-वडेरा  यांनी त्यांच्यावर वाजपेयी सरकारच्या काळात भाडं कमी करण्यासाठी सौदा केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. दिल्लीतल्या त्या घरासाठी केंद्र सरकारच्या नियमानुसारच भाडं भरत असल्याचं यावेळी प्रियंका गांधींनी सांगितलं. प्रियंका गांधी वाजपेयी सरकारच्या काळात भाडं कमी करण्यासाठी सौदेबाजी केल्याचं एका रिपोर्टमधून उघड झालं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, 2002मध्ये प्रियंका गांधींनी दिल्लीस्थित बंगल्याच्या भाड्याची रक्कम आवाक्याबाहेर असल्याचं सांगत 53,421 वरून ती 8,888 करून घेतली होती. त्यामुळे सगळीकडून त्यांच्यावर टीका होऊ लागली होती.  त्यावेळी वाजपेयींच्या काळातल्या भाजप सरकारनं निर्धारित केलेल्या रकमेनुसारच मी भाडं देत असल्याचं सांगत प्रियंका गांधींनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  प्रियंका गांधींना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप(एसपीजी)ची सुरक्षा देण्यात आली होती. डिसेंबर 1996मध्ये त्यांना खासगी निवास व्यवस्था भाड्यानं घ्यायची होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना सरकारी निवासस्थान राहण्यासाठी देण्यात आले. प्रियंका गांधींनी 2002मध्ये सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, 53 हजार 421 रुपये भाडं खूपच जास्त होतं असल्यानं मी ते भरू शकत नाही. मात्र दुसरीकडे प्रियंका गांधी लोधी इस्टेटला असलेल्या घराचं भाडं 31 हजार रुपये भरत असल्याची माहिती समोर आली आहे.